Loksabha Election 2024  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपासणीचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरीक्षकांमार्फत करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरीक्षकांमार्फत करण्यात येणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील पाचव्या मजल्यावरील निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षात खर्च तपासणी करण्यात येईल. ही तपासणी तीन टप्प्यांत होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी, तर दुसरी ७ मे, तर तिसरी तपासणी ११ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात सभागृह क्रमांक ३, चौथा मजला, बी विंग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे खर्च तपासणी करण्यात येणार आहे. पहिली तपासणी २ मे रोजी, दुसरी तपासणी ६ मे आणि तिसरी तपासणी १० मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी ३ मे रोजी, दुसरी तपासणी ७ मे आणि तिसरी तपासणी ११ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT