S . Chokkalingam sakal
लोकसभा २०२४

S . Chokkalingam : मतदारांना आवश्यक सुविधा पुरवा ; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना

‘‘जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत मतदानाचे प्रमाण वाढावे आणि सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, तसेच त्याची माहिती मतदारांना देण्यात यावी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत मतदानाचे प्रमाण वाढावे आणि सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, तसेच त्याची माहिती मतदारांना देण्यात यावी,’’ अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

निवडणूकविषयक आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, निवडणूक निरीक्षक आनंधी पालानीस्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार, निवडणूक पोलिस निरीक्षक जॉएस लाल्लरेमावी आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘‘एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्ष ठेवण्यात यावा. मतदारांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी शक्य असल्यास शहरी भागात प्रतीक्षा कक्षाची सुविधा करावी. मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानासाठी पगारी रजा देण्याच्या सूचना उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींना द्याव्यात.’’

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवावे. कुठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाययोजना करा. मतदानांसंबंधी सर्व अहवाल वेळेत सादर करावेत. वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. सी-व्हिजिलवर प्राप्त तक्रारींचे १०० मिनिटांत निराकारण करावे. मतदानाच्या वेळी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी मतदान केंद्र पथकाला मतदान आणि ईव्हीएमविषयक सूक्ष्म बाबींचे प्रशिक्षण द्यावे.

पोलिस विभागाने केलेल्या तयारीची माहिती या वेळी देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला भेट देऊन मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT