oksabha election AIMIM does not have a single seat esakal
लोकसभा २०२४

Exit Poll 2024: दोन शिवसेनेच्या लढतीत AIMIM महाराष्ट्रातून हद्दपार? एक्झिट पोलने औवेसींना किती जागा दिल्या? 

Exit Poll 2024: असदुद्दीन ओवैसी यांना त्यांची एकमेव जागा संभाजीनगर (औरंगाबाद) वाचवता येणार नाही . यावेळी त्यांच्या पक्षाला दोन शिवसेनेच्या लढतीत मोठा फटका बसणार आहे.

Sandip Kapde

लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जूनला लागणार आहे. त्यापूर्वी काल (शनिवार) एक्झिट पोल जाहीर झाले. यामध्ये अनेक अंदाज वर्तवण्यात आले. एक्झिट पोलनुसार असदुद्दीन ओवैसी यांना मोठा फटका बसणार आहे. यावेळी त्यांना संभाजीनगरची एकमेव जागा वाचवता येणार नाही. दोन शिवसेनेच्या लढतीत AIMIM मोठा फटका बसणार आहे. २०१९ मध्ये एआयएमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता.

असदुद्दीन ओवैसी यांना त्यांची एकमेव जागा संभाजीनगर (औरंगाबाद) वाचवता येणार नाही . यावेळी त्यांच्या पक्षाला दोन शिवसेनेच्या लढतीत मोठा फटका बसणार आहे. २०१९ यांनी ३ लाख ९० हजार मतदान घेत शिवसेना उमेदवार चंद्रकांच खैरे यांचा साडेचार हजार मतांनी पराभव केला होता.

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी सुमारे २ लाख ८५ हजार मते घेतली होती. जाधव यांनी चंद्रकांत खैरे यांच्या व्होटबँक तोडल्याचे त्यावेळी मानले जात होते. त्यामुळे खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान यावेळी ओवैसींनी जलील यांना पुन्हा एकदा संभाजीनगरमधून  उमेदवारी दिली आहे.

एआयएमआयएमने तीन जागांवर निवडणूक लढवली, तर चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून (यूबीटी) उमेदवार आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही येथून आपला उमेदवार उभा केला आहे. यावेळीही येथे तिरंगी लढत होणार आहे. तर AIMIM ने पुण्यातून अनीस सुंडके आणि उस्मानाबाद (धाराशिव) मधून सिद्दीकी इब्राहिम यांना उमेदवारी दिली आहे.

एबीपी सी-व्होटर एक्झिट पोलनुसार, एनडीएला एकूण ४८ जागांपैकी २२ ते २६ जागा मिळतील, तर 'इंडिया' आघाडीला २३ ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना म्हणजेच AIMIM ला येथे शून्य जागा मिळत आहेत.

न्यूज18 च्या एक्झिट पोलनुसार, एनडीए आघाडीला ३२ ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर 'इंडिया' आघाडीला १५  ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना म्हणजे AIMIM ला शून्य जागा मिळतील असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात एनडीए आघाडीला ३३ तर 'इंडिया' आघाडीला १५ जागा मिळतील, असा अंदाज टुडेजच्या चाणक्यने वर्तवला आहे. तर इतरांना म्हणजे AIMIM ला शून्य जागा मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT