Ajit Pawar sakal
लोकसभा २०२४

Ajit Pawar : महायुतीत जे ठरेल ते पाळणार,अजित पवार ; इंदापुरात भाजप पदाधिकारी मेळावा

‘गेल्या १० वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघात किती निधी आला, याचा विचार करा. महायुतीचा उमेदवार निवडून द्या. पाच वर्षांत यापेक्षा अधिक निधी आणू, अशी ग्वाही देत आगामी काळात महायुतीत जे ठरेल, ते मी पाळेन आणि मी शब्दाचा पक्का आहे,’’

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : ‘‘गेल्या १० वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघात किती निधी आला, याचा विचार करा. महायुतीचा उमेदवार निवडून द्या. पाच वर्षांत यापेक्षा अधिक निधी आणू, अशी ग्वाही देत आगामी काळात महायुतीत जे ठरेल, ते मी पाळेन आणि मी शब्दाचा पक्का आहे,’’ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

इंदापुरात आयोजित भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार, भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे, निहार ठाकरे, युवा नेते राजवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘देश मजबूत असेल तर राज्य, जिल्हे, तालुके, गावे मजबूत राहतील. यासाठी कणखर नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. त्यासाठी महायुतीचा खासदार निवडून द्या. केंद्रात आणि राज्यात एका विचाराचे सरकार असल्यास विकासाला चालना मिळते. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत आपले संविधान कोणीही बदलू शकत नाही. ’’

सुनेत्रा पवार यांनी बोलताना देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असणे आवश्यक असून, यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. लालासाहेब पवार, बाबामहाराज खारतोडे, कृष्णाजी यादव यांनी मनोगते व्यक्त केली. शरद जामदार यांनी प्रास्ताविक केले.

तुम्ही चिंता करायची सोडा

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘इंदापूरचे पालकत्व देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी घेतले आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. तसेच तालुक्याच्या काही भागात वीज कपात करण्यात आली. यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या कमळरूपी घड्याळाला मतदान करा.’’

आमचा संघर्ष राजकीय

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘गेली ३० वर्षे तुमचा आणि आमचा संघर्ष झाला. पण तो राजकीय होता. इंदापूर तालुक्यात दीड लाख मतदान आमच्या हक्काचे आहे. बारामतीपेक्षा जादा मताधिक्य देऊ, यापुढे इंदापूरमध्ये विकासाचे नवीन पर्व आणू. महायुतीचा धर्म पाळू.’’

२०१४, २०१९ च्या जखमा तशाच

अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, ‘‘२०१४ आणि २०१९ मध्ये जे घडले, त्याच्या जखमा अजून भरलेल्या नाहीत. २० वर्षांपासून आमचा संघर्ष राष्ट्रवादीबरोबर झाला आहे. तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांवर खूप अन्याय झाला आहे. मात्र आता महायुतीधर्म सर्व मित्रपक्षांनीही पाळला पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT