Govinda_Eknath Shinde
Govinda_Eknath Shinde 
लोकसभा २०२४

Jayant Patil: "जयंत पाटलांपेक्षा गोविंदा चांगला कलाकार"; CM एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : गोविंदाच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावरुन जयंत पाटलांनी टोलेबाजी केली होती. गोविंदा आता चालत नाही त्यामुळं चालणारा कलाकार तरी घ्यायचा अशा शब्दांत जयंत पाटील यांनी शिवसेनेवर कोटी केली होती. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे. (Govinda is a better actor than Jayant Patil CM Eknath Shinde reply to Jayant Patil statement)

गोविंदा यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जयंत पाटलांनी काय म्हटलं हे सांगितलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटलांपेक्षा गोविंदा हे चांगले कलाकार आहेत ना? असं शिंदे यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

दरम्यान, गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशामागं लोकसभेची गणितं असल्याची चर्चा सुरु आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून गोविंदाला लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. यापूर्वी गोविंदा २००४ ते २००९ या काळात काँग्रेसमधून खासदार बनले होते. त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. पण आता पुन्हा वीस वर्षानंतर गोविंदाची राजकारणाची दुसरी टर्म सुरु झाली आहे. (Marathi Tajya Batmya)

२०१० पासून २०१४ पर्यंत या १४ वर्षांच्या वनवासानंतर जिथं आहे तिथेच त्याच पक्षात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश करतो आहे. पक्षात आल्यानंतर मी इमानदारीत जबाबदारी पार पाडेन हे मी सर्वांना अश्वस्थ करतो, असं पक्ष प्रवेशावेळी गोविंदा यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

CBSE SSC HSC Result : महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के, तर बारावीत ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

IPL 2024 : बटलरसह इंग्लंडच्या तीन खेळाडूंचा आयपीएलला टाटा, बाय-बाय; राजस्थान पाठोपाठ आरसीबीलाही बसला मोठा झटका

Latest Marathi News Live Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT