Hatkanangle Lok Sabha 2024 esakal
लोकसभा २०२४

Hatkanangle Lok Sabha 2024: "७ मे सर्वजण साथ द्या...", राजू शेट्टी मैदानात उतरले, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केलं ट्वीट

Hatkanangle Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून आता राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

Sandip Kapde

Hatkanangle Lok Sabha 2024:

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून आता राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या सर्वाच चर्चेत आला तो हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. या मतदार संघात २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत असलेले धैर्यशील माने विजयी झाले होते. मात्र उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीत आहे. तर धैर्यशील माने हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे हातकणंगले मधील तगडी फाईट होणार आहे.

२०२९ च्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने यांना ५ लाख ८५ हजार म्हणजे ४६.७८ टक्के मतदान मिळाले होते. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना ४ लाख ८९ हजार ७३७ मतदान म्हणजे ३९ .११ टक्के मतदान झाले होते. राजू शेट्टी यांचा ९६ हजार ३९ मतांनी पराभव झाला होता.

दरम्यान आता महाविकास आघाडी राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजू शेट्टी यांनी दोन वेळा उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवास्थानी भेट घेतील. आज (शनिवार) देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Latest Marathi News)

आज लोकसभेसा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे.  ७ मेला म्हणजे तिसऱ्या टप्प्यात हातकणंगले मतदार संघात निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर ७   मे सर्वजण साथ द्या, असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  २००९ ते २०१४ ला राजू शेट्टी सलग दोनवेळा निवडून आले होते. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या निवेदीता माने यांचा पराभव केला होता.  तर २०१४ मध्ये कल्लाप्पा आवाडे यांचा पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT