Loksabha Election 2024  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : ‘एसडीपीआय’चा काँग्रेसला पाठिंबा कसा?

केरळमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (एसडीपीआय) लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वायनाड : केरळमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (एसडीपीआय) लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या पाठिंब्याबाबत काँग्रेसचे वायनाडमधील उमेदवार राहुल गांधी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. ‘

एसडीपीआय’ हा पक्ष म्हणजे बंदी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची राजकीय शाखा आहे. काँग्रेसवर टीका करताना वायनाड येथील भाजपचे उमेदवार के. सुरेंद्रन म्हणाले,‘‘पीएफआय संघटना देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न करत आहे.

ही संघटना आणि ‘एसडीपीआय’ हे जाहीरपणे हिंदू आणि ख्रिस्ती समुदायातील नागरिकांची हत्या करण्याची, मंदिरे-चर्च नष्ट करण्याची आणि भाजप नेत्यांवर हल्ले करण्याची चिथावणी देत असतात. याच ‘एसडीपीआय’ने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘पीएफआय’वर का बंदी घातली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून काँग्रेसनेही मिळेल तिथून पाठिंबा स्वीकारू, असे म्हटले आहे. हा प्रकार धक्कादायक असून राहुल गांधी यांनीच आता पक्षाची भूमिका स्पष्ट करावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रकरण! सुनेत्रा पवारांनी उचललं कठोर पाऊल; आढावा बैठकीत निर्देश

Pahalgam Tourist Places Reopen : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली १४ पर्यटनस्थळे पुन्हा सुरू होणार!

Latest Marathi News Update : भिवंडीत महापौर पदाच्या उमेदवारीसाठी न्यायालयाची अटी-शर्तींसह मुभा

SC On Pre Marriage: लग्नापूर्वी कुणावरही विश्वास ठेऊ नका; नातेसंबंधांत सजगता महत्त्वाची, न्यायालयाने का व्यक्त केली चिंता?

Pune News : महापालिकेत समाविष्ट २३ गावांसाठी दोन हजार कोटीचे कर्ज घेण्याची तयारी

SCROLL FOR NEXT