Uddhav Thackeray esakal
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात अनिल देसाई यांच्यासाठी शनिवारी उद्धव ठाकरेंची सभा पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शनिवारी उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचं निमंत्रण दिलं. (I invites PM Modi to attend oath ceremoney of Prime Minister of India Alliance says Uddhav Thackeray)

ठाकरे म्हणाले, "काही लोक हे दाखवण्यासाठी जवळचे असतात पण वेळ पडल्यानंतर तेच आपल्याविरोधात लढायला उभे राहतात, त्यांना कितीही दिलं तरी त्यांचं पोटचं भरत नाही. हा दादर विभाग कट्टर शिवसैनिकांचा आहे, त्यामुळं मुद्दाम मी इथं आलो आहे"

एका जिद्दीनं महाराष्ट्राच नव्हे तर देश पेटलेला आहे. आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला तुम्ही या हे निमंत्रण मी तुम्हाला आजच देतो आहे. हे निमंत्रण मी आज काय देतोय, तर खुर्चीवर माणूस बसलेला असतो तोपर्यंत त्याचं महत्व असतं नंतर त्याला कोणी विचारत नाही. त्यामुळं मुद्दामून मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आपल्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलवायचं आहे. कारण त्यांना दाखवून द्यायचं आहे की आता खऱ्या अर्थानं ४ जून नंतर देशाचे 'अच्छे दिन' सुरु होत आहेत, असंही यावेळी ठाकरे म्हणाले.

मोदीजी आणि शाहाजी तुम्ही आम्हाला लुटलंत ते आता खूप झालं. तुम्ही ज्या प्रमाणं आमचे उद्योग लुटले आणि गुजरातला पळवलेत तसे आता तुम्ही देखील गुजरातला जा आणि तुमच्या घरात निवांत पडून राहा आणि तुम्हाला शांत झोप लागो अशा शुभेच्छा मी मोदी-शहांना देतो, अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांवर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Side Story : कोल्हापूर अपघात घटना, तिघांच्या मृत्यूने गाव हळहळलं; फुलांच्या माळा, मिठाईचे डबे, दिवाळी खरेदी पिशव्या पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू...

Bhau Beej Travel: भाऊबीजच्या दिवशी भावाला घेऊन जा 'या' खास ठिकाणी; आठवणी ठरतील खास!

Diwali Padwa 2025 Marathi Wishes: नात्यात सदा राहो गोडवा, नवऱ्याला पाठवा दिवाळी पाडव्याचा मराठीतून खास शुभेच्छा

Viral News : ही बाई आहे की हैवान? गाढ झोपलेल्या नवऱ्यावर टाकले उकलते पाणी, नंतर अ‍ॅसिडने केला हल्ला, धक्कादायक कारण समोर...

Gold Rate Today : दिवाळी पाडव्यादिवशी सोन्या-चांदीत घसरण; तुमच्या शहरातील नवीन भाव काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT