Gulabrao Patil esakal
लोकसभा २०२४

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Gulabrao Patil: महायुतीत असताना गुलाबराव पाटलांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील जळगावमध्ये एका मेळाव्यात बोलत होते.

Sandip Kapde

Gulabrao Patil:

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहत आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना माहाराष्ट्रात रंगला आहे. भर उन्हात नेत्यांच्या सभा सुरु असून एकमेकांवर शाब्दीक चिखलफेक सुरु आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका मेळाव्यात जोरदार भाषण केलं. गुलाबराव पाटील जळगावमध्ये बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, भाजपने काम नाही केलं तर आम्ही ईमानदारीने काम केलं आहे. देशात पुन्हा एकदा आम्हाला भगवा फडकावचा आहे. मी एका बापाची औलाद आहे. हे भाजपवाले काम करो की नाही करो...जे होणार ते आमचं नशीब. मी पण मतदार आहे. माझं नाव आग विझवणारा असं होणार आहे.

उद्धव ठाकरे यांना सांगूनच मी २० आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेलो. गाडी रिव्हर्स घ्या, आपण चुकलोय असं मी ठाकरेंना सांगितलेलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही, शिवसेना पक्षाच्या निर्णय चुकला असं देखील मी सांगितलं, असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. महायुतीत असताना गुलाबराव पाटलांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेमध्ये झालेल्या फुटीनंतर मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकसभा २०२४ निवडणूक ही अस्तित्वाची लढाई देखील असणार आहे.  प्रत्येक राजकीय पक्षातील महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते वेगवेगळ्या निवडणुकीसाठी उमेदवारीच्या रांगेत उभे आहेत. आज तिसऱ्या टप्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत. ७ तारखेला तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुणे पोलिस आयुक्तालयात दोन नवीन परिमंडळे, पाच नवीन पोलिस ठाणी मंजूर!

IND vs SA: बुमराहपाठोपाठ हार्दिकचीही खास सेंच्युरी! 'असा' पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय ऑलराऊंडर

Maharashtra Sand Mafia: वाळू माफियाविरोधात मोठी कारवाई लवकरच! मुख्यमंत्र्यांचे ठाम आश्वासन, काय म्हणाले?

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

SCROLL FOR NEXT