kangana ranaut in mandi marathi news  esakal
लोकसभा २०२४

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

''लोकांना माझी गरज आहे, असं जर मला वाटलं आणि लोक माझ्याशी जोडले गेले तर मग मी त्याच दिशेने काम करेन. मी जर मंडी लोकसभा जिंकले तर मी राजकारणात जाईन. मला काही फिल्ममेकर सांगतात की, राजकारणात जाऊ नको..''

संतोष कानडे

Loksabha election 2024 : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. त्यांना भाजपने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या त्या पूर्णवेळ प्रचारात गुंतल्या आहेत. या निवडणुकीत आपला दणदणीत विजय होतील, असा त्यांना विश्वास आहे.

कंगना रणौत यांनी 'आज तक'शी बोलताना सांगितलं की, लोकसभेला निवडून आले तर बॉलीवूड सोडणार आहे. त्यानंतर पूर्णवेळ राजकारण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सिनेमा आणि राजकारण, हे कसं मॅनेज कारणार? या प्रश्नावर उत्तर देताना कंगना यांनी सांगितलं की, मी चित्रपटांमध्येही बोर होते.. मी रोलही करते आणि दिग्दर्शनही करते. जर मला राजकारणामध्ये करिअर दिसलं तर मग मी राजकारणच करेन. मी एकच आणि नेमकं काम करणार आहे.

''लोकांना माझी गरज आहे, असं जर मला वाटलं आणि लोक माझ्याशी जोडले गेले तर मग मी त्याच दिशेने काम करेन. मी जर मंडी लोकसभा जिंकले तर मी राजकारणात जाईन. मला काही फिल्ममेकर सांगतात की, राजकारणात जाऊ नको.. परंतु जर तुम्हाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर राजकारणात यावं लागेल.'' असं कंगना रणौत यांनी सांगितलं.

घराणेशाहीवर बोलताना कंगना म्हणाल्या की, कुठे ना कुठे आपण घराणेशाहीला राजकारण आणि चित्रपटांपुरतं मर्यादित ठेवलं आहे. घराणेशाही ही सगळ्यांचीच समस्या आहे आणि असलीच पाहिजे. या सगळ्यातून आपल्याला बाहेर आलं पाहिजे. आज मंडी मतदारसंघ माझा परिवार झाला आहे. कारण लोक मला 'मंडी की बेटी' म्हणून हाक मारत आहेत. हे माझं कुटुंब असून भावनेच्या आहारी नाही गेलं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shivaji University GeM Purchase: प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल जीईएम खरेदी व्यवहारांची तपासणी सुरू; अंतर्गत लेखापरीक्षक करणार मार्गदर्शक सूचना

SCROLL FOR NEXT