Karnataka BJP  Esakal
लोकसभा २०२४

Karnataka BJP: ‘अब की बार, 400 पार’ चा नारा देणाऱ्या भाजपची कर्नाटकात कसोटी, २०१९ ची पुनरावृत्ती की पिछेहाट?

Karnataka Congress: गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश हे काँग्रेसचे एकमेव उमेदवार लोकसभेत गेले होते. भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या. जेडीएसला एक जागा मिळाली होती.

राजेश सोळसकर - @solaskarsakaal

राजेश सोळसकर

गत निवडणुकीत २८ पैकी तब्बल २५ जागा जिंकून कर्नाटकात काँग्रेसचा सफाया केलेल्या भाजपपुढे यावेळी मात्र संख्याबळ राखण्याचे आव्हान आहे. ‘अब की बार, चारसौ पार’ असा देशपातळीवर नारा देणाऱ्या भाजपच्या जागा कर्नाटकात गतवेळच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता सद्यःस्थितीत दिसते आहे.

कर्नाटकात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होत आहेत. २६ एप्रिलला १४ जागांसाठी, तर उर्वरित १४ जागांसाठी सात मे रोजी मतदान होईल. भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांची युती विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना होत आहे. त्यामुळे बहुतांश लढती लक्षवेधी ठरणार आहेत.

गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश हे काँग्रेसचे एकमेव उमेदवार लोकसभेत गेले होते. भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या. जेडीएसला एक जागा मिळाली होती, तर एक अपक्ष विजयी झाला होता. भाजपने यावेळी किमान २० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर काँग्रेसने दोन अंकी संख्या गाठण्याचा चंग बांधला आहे.

असं मानलं जातं, की २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसची देशभरात वाताहत झाली. कर्नाटकात मात्र त्याआधीपासूनच लोकसभेसाठी काँग्रेसची पीछेहाट सुरू झाली होती. १९९९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने येथे सर्वाधिक १८ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त आठ जागा मिळू शकल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये सहा, तर २०१४ मध्ये नऊ जागा मिळाल्या होत्या.

२०१९ मध्ये तर काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. याचा अर्थ भाजपने २००४ पासून या राज्यात आपले पाय घट्ट रोवण्यास सुरवात केली होती. पुढे आलेल्या मोदी लाटेत भाजप अधिकच भक्कम झाला. पार्श्वभूमी ही अशी असली, तरी या निवडणुकीत मात्र भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रमांक एकचा पक्ष म्हणून भाजप आपले स्थान कायम ठेवेल; पण काँग्रेसच्या जागा निश्चित वाढतील, कारण यावेळी परिस्थिती बदलली आहे. याशिवाय भाजपपुढे बंडाळीचे आव्हान असताना काँग्रेसने योग्य व्यक्तींना दिलेली उमेदवारीही त्या पक्षाला तारण्याचीच शक्यता आहे.

‘कुटुंबकल्याणा’चा राष्ट्रीय कार्यक्रम!

काँग्रेसमधील घराणेशाहीवर भाजप सातत्याने टीका करतो. कर्नाटकात मात्र भाजपला या टीकेचा विसर पडला की काय असा प्रश्न पडतो. कारण येथे भाजपने सहा जागांवर नेत्यांच्या नातलगांना उमेदवारी दिली आहे. अर्थात, घराणेशाहीबाबतीत काँग्रेस येथेही आघाडीवर आहेच. एकूण १४ मतदारसंघांत काँग्रेसच्या नेत्यांचे जवळचे नातलग निवडणूक लढवत आहेत. जेडीएसला मिळालेल्या तीनपैकी दोन जागांवर देवेगौडा कुटुंबीयांचे जवळचे नातेवाईक उभे आहेत. यातील रंजक बाब अशी, की एकूण २८ मतदारसंघांमध्ये तब्बल २२ जण तिन्ही पक्षांतील नेत्यांचे कोणी ना कोणी नातलग उमेदवार आहेत.

एकीकरण समितीचे दोन उमेदवार

महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमधून महादेव पाटील आणि कारवारमधून निरंजन देसाई हे उमेदवार दिले. सीमा भागात मराठी भाषेवर फिरवल्या जात असलेल्या वरवंट्याच्या मुद्द्यावर हे दोन उमेदवार आहेत. त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, याकडेही महाराष्ट्राचे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT