Loksabha election 2024
Loksabha election 2024  esakal
लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : पंजाबच्या खडूर साहिब मतदारसंघातून खलिस्तानी समर्थक अमृतपाल निवडणूक लढवणार

संतोष कानडे

Khalistan Supporter Amritpal : आसामच्या डिब्रूगड जेलमध्ये असलेला खलिस्तानी समर्थक आणि वारिस पंजाब दे संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंह हा पंजाबमध्ये लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी अमृतपालच्या वकिलांनी याबाबत सूतोवाच केलं होतं. आता चित्र स्पष्ट झालं असून NSAच्या अंतर्गत जेलमध्ये असलेला अमृतपाल पंजाबच्या खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. 'आज तक'ने हे वृत्त दिले आहे.

NSA अंतर्गत जेलमध्ये बंद असलेला अमृतपाल सिंह निवडणूक लढवणार आहे. काही दिवसांपूर्वी अमृतपालच्या वकिलांनीही याबाबत माहिती दिली होती. त्यांनी जेलमध्ये अमृतपालसोबत बातचित केल्यानंतर ही माहिती पुढे आली होती.

अमृतपालने मीडियासाठी एस मेसेजसुद्धा जारी केला आहे. ज्यामध्ये त्याने खडूर साहिब मतदारंसघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं. वास्तविक तो कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नसून अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहे. ७ ते १७ मे दरम्यान तो उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

दरम्यान, मागच्या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी अमृतपाल आणि त्याची संघटना वारिस पंजाब देच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांच्या हातामध्ये तलवारी होत्या. हा गोंधळ काही तास चालला होता. अमृतपालचा समर्थक लवप्रीत तुफानच्या सुटकेसाठी हा हल्ला करण्यात आलेला होता.

बरिंदर सिंह नावाच्या इसमाचं अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी लपप्रीतला ताब्यात घेतलं होतं. मात्र झालेल्या गोंधळानंतर पोलिसांना त्याला सोडून दिलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी अमृतपालचा माग काढून त्याला ताब्यात घेतलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT