Kolhapur Hatkanangale Constituency Lok Sabha election exit poll esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Exit Poll Results : 'एक्झिट पोल'मुळे उत्सुकता शिगेला; लोकसभा निकालावर ठरणार जिल्ह्याचं राजकीय समीकरण

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll) जाहीर झाल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सकाळ डिजिटल टीम

चौरंगी लढत होत असलेल्या हातकणंगलेत ‘वंचित’चे डी. सी. पाटील किती मते घेणार यावर महाविकाससह महायुती व शेट्टी यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll) जाहीर झाल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निकालाला अवघ्या तीन दिवसांचा अवधी राहिल्याने कोल्हापुरातून विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक की श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, तर हातकणंगलेतून विद्यमान खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी की माजी आमदार सत्यजित पाटील विजयी होणार, याविषयीची उत्सुकता ताणली आहे.

लोकसभेच्या निकालावर (Kolhapur Lok Sabha Elections) जिल्ह्याचे आगामी राजकीय समीकरण निश्‍चित होणार असल्याने या निवडणुकीच्या निकालावर राजकीय क्षेत्रात पैजा लागल्या आहेत. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर विधानसभेला चांगलीच रंगत येणार असून, अनेकांचे राजकीय भवितव्यही ही निवडणूक ठरवणार आहे. कोल्हापुरात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासमोर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे मोठे आव्हान आहे.

चौरंगी लढत होत असलेल्या हातकणंगलेत ‘वंचित’चे डी. सी. पाटील किती मते घेणार यावर महाविकाससह महायुती व शेट्टी यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. हातकणंगलेत विद्यमान खासदार महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याविरोधात माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांचे मोठे आव्हान आहे.

दोन्हीही मतदारसंघांत सात मेनंतर दोन दिवस कोण विजयी होणार, याची चर्चा चांगलीच रंगली. त्यानंतर उमेदवार, त्यांचे समर्थक शांत होते. आता निकालाची तारीख जशी जवळ येईल तशी उमेदवारांसह त्यांच्या मागे ताकद लावलेले नेते, कार्यकर्ते यांची धाकधूक वाढली आहे. पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघ झालेल्या मतदानाची आकडेवारी घेऊन विजयाचा ठोकताळा बांधला जात आहे. आपलाच उमेदवार कसा विजयी होणार याचे आराखडे या आकडेवारीवरून सांगितले जात आहेत. त्यात किती तथ्य आहे, याचा फैसला मंगळवारी (ता. ४) होईलच. दोन्ही मतदारसंघांतील विजयावर अनेकांच्या पैजा तर लागल्या आहेतच; पण सट्टाबाजारातही कोट्यवधीची उलाढाल झाल्याचे समजते.

मतमोजणी केंद्रावर ‘वॉच’

सात मे रोजी मतदान झाल्यापासून उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी मतमोजणी केंद्राबाहेर २४ तास राबता ठेवला आहे. त्यासाठी काही कार्यकर्त्यांची नियुक्ती केली असून, दर चार तासांनी हे कार्यकर्ते बदलले जातात. याशिवाय दर दोन दिवसांनी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमची तपासणी केली जाते. काल (ता. ३१) या केंद्राद्वारे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची सीडी प्रतिनिधींच्या उपस्थितीत बदलण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT