Konkan Lok Sabha Elections 2009
Konkan Lok Sabha Elections 2009 esakal
लोकसभा २०२४

Konkan Lok Sabha : शिवसेनेचा बालेकिल्ला 2009 च्या निवडणुकीत उद्ध्वस्त; प्रभूंचा पराभव करत राणेंनी मारली बाजी

- शिवप्रसाद देसाई

राणेंनी पूर्ण ताकद लावली. शिवसेनेने मुंबईतूनही संघटनात्मक बळ पुरविले; पण यात शेवटी शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला.

Konkan Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत २००४ पासून तयार झालेला शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला २००९ च्या निवडणुकीत उद्ध्वस्त झाला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश नारायण राणे (Nilesh Narayan Rane) यांनी सुरेश प्रभूंचा (Suresh Prabhu) पराभव केला. रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनंत गीतेंनी मात्र रायगडमधून निवडणूक लढवत मोठा विजय मिळविला.

कोकणात २००९ ची लोकसभा निवडणूक लक्षवेधी ठरली. मतदारसंघ पुनर्रचनेनंतरची ही पहिलीच लढत होती. राजापूरऐवजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ (Ratnagiri-Sindhudurg Constituency) तयार होऊन तो चिपळूणपर्यंत विस्तारला होता. पुढे, रायगड मतदारसंघ लागला होता. यापूर्वी कोकणातील शिवसेनेचे मोठे नेते नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये जाऊन तेथे आपले भक्कम स्थान निर्माण केले होते.

शिवसेनेचे खासदार सुरेश प्रभूंनी मधल्या काळात मतदारसंघाशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. शिवसेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्गातून प्रभूंनाच उमेदवारी दिली. काँग्रेसतर्फे नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र डॉ. नीलेश रिंगणात होते. शिवसेनेत असताना प्रभू राणेंच्या पाठबळावर निवडून यायचे. मात्र या वेळची लढत वेगळी होती. याकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राणेंनी पूर्ण ताकद लावली. शिवसेनेने मुंबईतूनही संघटनात्मक बळ पुरविले; पण यात शेवटी शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला.

या मतदारसंघात शिवसेनेचे सुरेश प्रभू (३,०७,१६५ मते), तिसऱ्या आघाडीचे सुरेंद्र बोरकर (१८,८५८), बसपचे डॉ. जयेंद्र परुळेकर (१५,४६९), क्रांतिकारी जयहिंदू सेनेचे अजय जाधव (७४०५), राष्ट्रीय समाज पक्षाचे राजेश सुर्वे (२३५८), हिंदू महासभेचे विलास खानविलकर (२४४८), भारिप-आंबेडकर गटाचे सिराज ए. कौचाली (६५८७), अपक्ष अकबर महंमद खलपे (५४१६) यांचा डॉ. नीलेश राणे यांनी (३,५३,९१५) पराभव केला.

सलग चार निवडणुका जिंकून रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गीते यांनी रायगड मतदारसंघ निवडला. पूर्वी रत्नागिरी मतदारसंघ महाडपर्यंत होता. नव्या रचनेत तो श्रीवर्धन-पेणपर्यंत पोहोचला होता. बराच भाग नवा होता. असे असूनही गीतेंनी मोठा विजय मिळविला. काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरीही त्यांना काही प्रमाणात लाभदायक ठरली. यात काँग्रेस आघाडीचे बॅ. ए. आर. अंतुले (२,६७,०२५), काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रवीण ठाकूर (३९,१५९), अपक्ष सुनील नाईक (२२,२००), राष्ट्रीय समाज पक्षाचे एकनाथ पाटील (३८२६), बसपचे किरण मोहिते (१३,०५३), डॉ. सिद्धार्थ पाटील (८५५९) यांचा अनंत गीते यांनी ४ लाख १३ हजार ५४६ मते मिळवत दारुण पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT