Latur loksabha Constituency  sakal
लोकसभा २०२४

Latur loksabha Constituency : नवख्या उमेदवारावर काँग्रेसकडून डाव

लोकसभेच्या लातूर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे. राजकारणापासून अलिप्त असलेले पण गेल्या तीन निवडणुकांपासून सातत्याने चर्चेत राहिलेले डॉ. काळगे यांच्या माध्यमातून काँग्रेसने या मतदारसंघात नवख्या उमेदवारावर डाव टाकला आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : लोकसभेच्या लातूर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे. राजकारणापासून अलिप्त असलेले पण गेल्या तीन निवडणुकांपासून सातत्याने चर्चेत राहिलेले डॉ. काळगे यांच्या माध्यमातून काँग्रेसने या मतदारसंघात नवख्या उमेदवारावर डाव टाकला आहे. त्यांची खरी भिस्त माजीमंत्री, आमदार अमित देशमुख यांच्यावरच अवलंबून आहे.

लातूर मतदारसंघ एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शिवराज पाटील चाकूरकर यांनी सलग सातवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २००४ मध्ये त्यांचा भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी पराभव केला. त्यांच्या माध्यमातून भाजपने पहिल्यांदाच या मतदारसंघावर वर्चस्व गाजवले. त्यानंतर २००९ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोल्हापूरच्या जयवंतराव आवळे यांना उमेदवारी देत निवडून आणले होते. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलून गेली. त्यात २०१४ पासून नरेंद्र मोदी यांची लाट सुरू झाली.

या निवडणुकीत पक्षाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले दत्तात्रय बनसोडे यांना उमेदवारी दिली. पण त्यांना पराभव पत्कारावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने मच्छिंद्र कामत यांच्या माध्यमातून एका उद्योजकला समोर आणले. पण मोदीत लाटेत त्यांचाही पराभव झाला. आताच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली तरी कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली नव्हती. कार्यकर्तेही मरगळलेल्या अवस्थेतच होते.

अखेर पक्षाने येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते राजकारणी नाहीत. पण गेल्या तीन निवडणुकांपासून त्यांचे नाव चर्चेत आहे. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपकडून त्यांच्या नावाची चर्चा होती. या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे नेते डॉ. काळगे यांच्यावर गळ टाकून होते. काळगे हेही द्विधा मनःस्थितीत होते. अखेर कॉंग्रेसने त्यांच्या नवावर शिक्कामोर्तब केले. या मतदारसंघात भाजपने गेल्याच आठवड्यात विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता त्यांना काळगे प्रतिस्पर्धी असतील. अन्य पक्षांचे पत्ते अद्याप खुले व्हायचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT