Liquor Policy Case sakal
लोकसभा २०२४

Liquor Policy Case : ‘जेल का जवाब व्होट से’ ; ‘आप’ची मोहीम,मतदारांना भावनिक आवाहन

मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी आम आदमी पक्षाने ‘जेल का जवाब व्होट से’ (तुरुंगवासाचे उत्तर मतदानातून) ही मोहीम आज सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी आम आदमी पक्षाने ‘जेल का जवाब व्होट से’ (तुरुंगवासाचे उत्तर मतदानातून) ही मोहीम आज सुरू केली आहे. वीजबिल सवलत, मोफत प्रवास यांसारख्या सुविधांच्या आधारे या मोहिमेमध्ये मतदारांना साद घातली जाणार आहे.

या मोहिमेच्या निमित्ताने खासदार संजय सिंह यांनी दिल्लीकरांना मतदानावेळी केजरीवाल सरकारच्या कामांचे स्मरण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की घरातील विजेचे बिल, मुलांच्या शिक्षणाची सुधारलेली व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना मिळालेली मोफत तीर्थयात्रेची सुविधा, महिलांना मिळालेली मोफत बस प्रवासाची सुविधा या गोष्टी दिल्लीकरांनी लक्षात ठेवाव्यात आणि केजरीवाल यांनाही लक्षात ठेवावे.

कारण केजरीवाल यांना हुकूमशाही पद्धतीने खोट्या प्रकरणात तुरुंगामध्ये टाकले आहे. त्यांच्या तुरुंगावासाचे उत्तर मतदानातून द्यायचे आहे, असेही संजयसिंह म्हणाले. तर, खासदार संदीप पाठक यांनीही दिल्लीकरांना भावनिक साद घातली.

ते म्हणाले, की आज अरविंद केजरीवाल तुरुंगात असले तरी त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. आता दोन कोटी दिल्लीकरांची जबाबदारी आहे. केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी मंत्र्यांपासून ते सरकारपर्यंत सारे काही पणाला लावले. दिल्लीत प्रामाणिकपणे सुरू असलेले राजकारण संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे त्याचा बचाव करण्याची जबाबदारी दिल्लीकरांची असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT