Karan Pawar_Unmesh Patil 
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेकडून कल्याण, जळगावसह चार जागा जाहीर; 'हे' असतील उमेदवार

मुंबई पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी या उमेदवारांची घोषणा केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या चार लोकसभा उमेदवारांची आज उद्धव ठाकरेंनी घोषणा केली. मातोश्रीवर झालेल्या उन्मेष पाटील यांच्यासह करण पवार आणि इतरांच्या शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार कार परिषदेत त्यांनी या उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये कल्याण, जळगाव, पालघर आणि हातकणंगले या चार जागांचा समावेश आहे. (Uddhav Thackeray Shivsena announces four seats Kalyan Jalgaon Palghar and Hatkangale)

'हे' आहेत उमेदवार

शिवसेनेनं कल्याण, जळगावसह चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये वैशाली दरेकर (कल्याण), सत्यजीत पाटील (हातकणंगले), भारती कामडी (पालघर) तर करण पवार (जळगाव) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Marathi Tajya Batmya)

आम्ही वाटाघाटीत ठरल्याप्रमाणं मुंबईतील चार जागा आधीच जाहीर केल्या आहेत. पण मुंबई उत्तरची जागेसाठी आम्ही मित्र पक्षाला विचारतोय जर त्यांनी ती लढवली नाही तर आम्ही त्या जागेवरही उमेदवार जाहीर करु, असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

जळगावमधून भाजपनं विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर लगेचच ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जळगावमधून शिवसेनेकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर होईल असं वाटत होतं. पण उद्धव ठाकरेंनी धक्कातंत्र अवलंबत करण पवार यांना उमेदवारी जाहीर केली. करण पवार यांचं नवा खुद्द उन्मेष पाटील यांनीच सुचवल्याचं यावेळी ठाकरेंनी सांगितलं. (Latest Marathi News)

करण पवार कोण आहेत?

करण पवार हे उन्मेष पाटलांचे कट्टर समर्थक आहेत. पारोळा-एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे करण पवार हे नातू आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते डॉ. संतोष पाटील यांचे ते पुतणे आहेत. करण पवार यांनी पारोळा नगरपालिकेत भाजपकडून नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे. यापूर्वी एरंडोल विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी त्यांनी प्रयत्न केला होता. मराठा समाजाचा तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे. (Latest Maharashtra News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT