Loksabha election 2024 esakal
लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : पोपट सांगतोय निवडणुकीचं भविष्य! मालकाला झाली अटक; आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापलं

चित्रपट दिग्दर्शक शंकर बचन हे पीएमके अर्थात पट्टाली मक्कल काची या पक्षाचे कुड्डलोर मतदारसंघाचे उमेदवार आहेत. थंकर हे रविवारी मतदारसंघातल्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी ते एका मंदिरापासून जात असताना मंदिराच्या बाहेर एक ज्योतिषी बसलेला होता.

संतोष कानडे

Loksabha election 2024 : तमिळनाडूतल्या कुड्डालोर लोकसभा मतदारसंघात पोपटावरुन राजकारण तापलं आहे. पोलिसांनी एका पोपट मालकाला ताब्यात घेतलं असून एका उमेदवाराचं भविष्य पोपटाने सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

निवडणुकीच्या रिंगणात असलेले 'पीएमके'चे उमेदवार थंकर बचन यांच्या विजयाची भविष्यवाणी पोपटाने केली होती. त्याचा एक व्हिडीओदेखील पुढे आलेला आहे. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर पोलिसांनी पोपटाच्या मालकाला ताब्यात घेतलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट दिग्दर्शक शंकर बचन हे पीएमके अर्थात पट्टाली मक्कल काची या पक्षाचे कुड्डलोर मतदारसंघाचे उमेदवार आहेत. थंकर हे रविवारी मतदारसंघातल्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी ते एका मंदिरापासून जात असताना मंदिराच्या बाहेर एक ज्योतिषी बसलेला होता. त्याच्याकडे पिंजऱ्यात एक पोपट होता. हा पोपट समोर ठेवलेल्या कार्डमधून एक कार्ड निवडून भविष्य सांगत होता.

उमेदवार थंकर बचन यांनीही आपलं भविष्य या पोपटाकडून बघितलं. यावेळी त्यांचे समर्थकदेखील सोबत होते. पोपटाच्या पुढ्यात अनेक कार्डस् पडलेले होते. त्याला एक कार्ड निवडायचं होतं. पोपटाने एक कार्ड आपल्या चोचीमध्ये उचललं. कार्डवर त्या मंदिरातील देवतेचा फोटो होता. कार्डवरचा मजकूर बघतिल्यानंतर पोपटाच्या मालकाने थंकर बचन हे विजयी होतील, अशी भविष्यवाणी केली.

भविष्यवाणी ऐकून खूश झालेले पीएमके उमेदवारांनी पोपटाला खाऊ दिला. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोपटाचा मालक ज्योतिषी सेल्वराज आणि त्याच्या भावाला काही वेळासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

त्यानंतर पोपटाला पिंजऱ्यात ठेवल्याबद्दल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भविष्यकाराला चांगलंच खडसावलं. पोपटाला मुक्त करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे भविष्यकाराकडे आणखी पोपट मिळून आलेले आहेत. त्यांनाही जंगलामध्ये सोडून देण्यात आलेलं आहे.

या घटनेनंतर पीएमकेचे अध्यक्ष डॉ. अंबुमनी रामदास यांनी म्हटलं की, द्रमुक सरकारने ही कारवाई केली कारण त्यांना त्यांच्या संभाव्य पराजय सहन झाला नाही. त्यांना पोपटाची भविष्यवाणीही सहन झाली नाही तर पुढे काय होईल? असा चिमटा त्यांनी काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT