Lok Sabha Election 2024 How much black money Congress received from Adani and Ambani says PM Modi in Telangana  Sakal
लोकसभा २०२४

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

PM Modi: तेलंगणातील करीमनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी प्रश्न विचारला की काँग्रेसने अचानक अदानी-अंबानींची नावे घेणे का बंद केले?

राहुल शेळके

PM Modi: तेलंगणातील करीमनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी प्रश्न विचारला की काँग्रेसने अचानक अदानी-अंबानींची नावे घेणे का बंद केले? पीएम मोदी म्हणाले, 'तुम्ही पाहिलं असेल की, गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे शहजादे सकाळी उठल्याबरोबर जपमाळ जपायला सुरुवात करत होते.

जेव्हापासून त्यांचे राफेल प्रकरण शांत झाले आहे. तेव्हापासून त्यांनी नवीन जपमाळ करण्यास सुरुवात केली. पाच वर्षे एकच जपमाळ जपायची. पाच उद्योगपती, पाच उद्योगपती. मग हळूच म्हणू लागले अंबानी-अदानी. मात्र निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदानींना शिव्या देणे बंद केले.

पंतप्रधानांनी काँग्रेसला प्रश्न विचारला की, या निवडणुकीत अंबानी-अदानी यांच्याकडून किती पैसा जमा केला. त्यांनी विचारले, 'तुम्ही काळा पैसा किती पोती घेतला? टेम्पो भरून नोटा काँग्रेसपर्यंत पोहोचल्या आहेत का? काय डील झाली. तुम्ही रातोरात अंबानी-अदानींना शिव्या देणे बंद का केले. याचा अर्थ, भरलेल्या टेम्पोमध्ये तुम्हाला काही चोरीचा माल सापडला आहे. याचे उत्तर देशाला द्यावे लागेल.

पंतप्रधान म्हणाले, 'तेलंगणाच्या निर्मितीवेळी येथील लोकांनी बीआरएसवर विश्वास ठेवला होता. बीआरएसने लोकांच्या स्वप्नांचा भंग केला . काँग्रेसचाही तोच इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनेही तेच केले. देश बुडला तरी चालेल, पण त्यांच्या कुटुंबाला काही फरक पडत नाही.

फॅमिली फर्स्ट या धोरणामुळे काँग्रेसने पीव्ही नरसिंह राव यांचा अपमान केला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला काँग्रेस कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. पीव्ही नरसिंह राव यांना भाजप सरकारने भारतरत्न देऊन गौरवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mexico Firing : फुटबॉल सामन्यावेळी बेछूट गोळीबार; ११ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी

पाकड्यांची मस्ती काही जात नाही! T20 World Cup स्पर्धेसाठी संघ जाहीर केला; तरी म्हणतात, आम्ही खेळूच असं नाही...

बापरे! मराठमोळ्या रिलस्टारचं निधन, प्रथमेश कदमच्या जाण्याने सगळ्यांनाच बसला धक्का, आई-मुलाची होती सुपरहिट जोडी

Chakur News : अपघाताने हिरावला हात, प्रेमाने दिली साथ; प्रीती कानवटे-दिनेश जाधव यांचा विवाह ठरतोय प्रेरणादायी

Latest Marathi news Update : मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT