pm Narendra Modi criticized Congress leader Rahul Gandhi over the word Shakti used in his speech Sakal
लोकसभा २०२४

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा; दोन दिवसात सहा सभा...

संतोष कानडे

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांमध्ये मोदींच्या तब्बल सहा सभा होणार आहेत.

२९ आणि ३० एप्रिल दोन दिवसांमध्ये पंतप्रधानांच्या सहा सभा होणार आहेत. ⁠२९ एप्रिलला तीन तर ३० एप्रिलला तीन सभा होतील. ⁠२९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर शहरात पहिली सभा होईल. त्यानतंर ⁠कराडमध्ये दुपारी एक वाजता दुसरी सभा होईल. संध्याकाळी सहा वाजता पुण्यामध्ये तिसरी सभा होणार आहे.

पुण्यातील सभेनंतर पंतप्रधान मोदी पुण्यातच मुक्कामी थांबणार आहेत. राजभवन येथे मोदींचा मुक्कामी असेल. दुसऱ्या दिवशी ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता माळशिरस येथे पहिली सभा होईल. त्यानतंर लातूरमध्ये दुपारी एक वाजता सभा होणार आहे असून मोदींची राज्यातील शेवटची सभा धाराशिव येथे चार वाजता होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मालमत्ता, मंगळसूत्र, राम मंदिर या मुद्द्यांवर सध्या पंतप्रधानांच्या सभा गाजत आहेत. महाराष्ट्रात मोदी आणखी कोणते नवीन मुद्दे उपस्थित करतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

SCROLL FOR NEXT