narendra modi rahul gandhi esakal
लोकसभा २०२४

Maharashtra Lok sabha election result 2024 : ED-CBI च्या भीतीने पक्ष बदलणाऱ्यांना झटका; १३ पैकी ९ जण पराभूत

संतोष कानडे

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अनेक नेत्यांनी पक्षबदल केला होता. त्यामधल्या बहूतांश जणांना पराभवाचं तोंड बघावं लागलं आहे. पराभूत झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातून शिवसेनेच्या यामिनी जाधव, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे तापस रॉय, झारखंमध्ये काँग्रेसचे प्रदीप यादव, राजस्थानमधील ज्योती मिर्धा या नावांचा समावेश आहे.

पक्षबदल केलेल्या या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांना सामोरं जावं लागलं होतं किंवा त्यांच्या कुटुंबियांना तपास यंत्रणांचा जाच सुरु झाला होता. पराभूत झालेल्या नऊ जणांपैकी सात जण भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांचे नेते होते.

देशभरामध्ये १३ नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा सामना करत आहेत. यामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा समावेश आहे. १३ पैकी आठ जण भाजपमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यापैकी सात जण काँग्रेसमधून गेले आहेत तर एक तृणमूल काँग्रेसधून झारखंड विकास पार्टीमध्ये गेले आहेत.

पराभूत झालेल्या पक्षबदलू उमेदवारांमध्ये राजस्थानच्या नागौरमधून ज्योती मिर्धा, उत्तर प्रदेशातल्या जैनपूर येथून कृपाशंकर सिंह, कोलकाता उत्तर प्रदेशातून तपस रॉय, आंध्र प्रदेशातल्या अराकूमधून कोथापल्ली गीता, पियालामधून प्रणीत कौर आणि झारखंडमधून सिंहभूममधून गीता कोडा यांचा समावेश आहे.

पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते ज्योती निर्धा लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये भाजपमध्ये सहभागी झाले होते. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते.

शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये सहभागी झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं. यामिनी आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर अनेक प्रकरणांमध्ये ईडीची चौकशी सुरु होती. त्यांना एनडीएने मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. परंतु त्यांना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी पराभूत केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT