Lok Sabha Election 2024 esakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: अजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर, बारामतीबाबत सस्पेन्स...

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने आज पत्रकार परिषद घेतली. बारामतीच्या जागवेर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Sandip Kapde

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने आज पत्रकार परिषद घेतली. बारामतीच्या जागवेर या बैठकीत चर्चा करण्यात आली. महादेव जानकर बारामतीत लढवणार ही अफवा आहे. शिरुर, बारामती, धाराशीव, परभणी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच अजित पवार यांनी आज पहिला उमेदवार जाहीर केला आहे.

रायगडमधून सुनील तटकरे यांची उमेदवारी अजित पवार यांनी घोषित केली. महायुतीत जागावाटपाचं ९९ टक्के काम पूर्ण करण्यात आलं आहे. संध्याकाळी आढाळराव पाटील यांचा पक्षप्रवेश आहे. त्यानंतर बाकी उमेदवार जाहीर होतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

महायुतीत कोणतेही गैरसमज नाहीत. महायुतीच्या ४८ जागांमध्ये महाराष्ट्रात कोणी किती जागा लढवाव्या ९९ टक्के काम झालं आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपला २३ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या. ४ राष्ट्रवादी काँग्रेस, १ नवनीत राणा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. एमआयएमची एक जागा होती. राष्ट्रवादीला फक्त ३ जागा मिळतात, कारण नसताना अशी चर्चा पसरवली गेली. मात्र कार्यकर्त्यांचं समाधान होईल तेवढ्या जागा मिळाल्या आहेत. एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्ही ते जाहीर करु. बारामतीत तुमच्या मनात ज्यांच नाव आहे, त्यांच नाव जाहीर होणार आहे, असे देखील अजित पवार म्हणाले.

जाहीरनाम्यावर काम सुरु आहे. लकरच आम्ही जाहीर करु. राष्ट्रवादीच्या वाट्यातील जागा शेवटच्या तीन टप्प्यात आहेत. महायुतीच्या स्टार प्रचारकांच्या याद्या तयार झाल्या असल्याचे पवार म्हणाले. (Latest Marathi News)

बारामती बाबत थोडा सस्पेंस ठेवू द्या. २८ तारखेला नाव जाहीर करतो. पण तमुच्या मनात जे नाव आहे ते जाहीर करणार, असे अजित पवार म्हणाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा'; एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही; शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT