Karnataka CM Siddaramaiah Rahul Gandhi esakal
लोकसभा २०२४

'नरेंद्र मोदींना हटवा आणि राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करा'; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे मतदारांना आवाहन

नरेंद्र मोदींना हटवून राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी जनतेने साथ द्यावी.

सकाळ डिजिटल टीम

'लोकसभा निवडणुकीतही अधिक जागा जिंकण्याच्या आशेने काँग्रेसने कुरुडुमले गणपती मंदिरापासूनच निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.'

बंगळूर : लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पंतप्रधानपदावरून हटवून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देशाचे पंतप्रधान करा, असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Karnataka CM Siddaramaiah) यांनी शनिवारी केले. काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे कोलार येथे रणशिंग फुंकल्यानंतर त्यांनी ‘रोड शो’ काढला. यावेळी त्यांनी मतदारांना मार्गदर्शन केले.

सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘काँग्रेस नेहमी आश्वासनाप्रमाणे चालते. काँग्रेसने कर्नाटकात दिलेली आश्वासने पूर्ण करून जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केली जाईल. काँग्रेसने (Congress) शुक्रवारी हमी योजना जाहीर केल्या आहेत, आम्ही त्यांची पूर्तता करू. भाजप सरकार हटवून केंद्रात काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नरेंद्र मोदींना हटवून राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी जनतेने साथ द्यावी.’’

काँग्रेस उमेदवाराच्या रोड-शोला मार्गदर्शन करताना सिद्धरामय्या पुढे म्हणाले, ‘‘भाजप म्हणजे ‘लबाडीचा कारखाना’ आहे. भाजपने तयार केलेल्या खोट्या आमीषांना बळी पडू नका. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, खते, स्वयंपाकाचे तेल, डाळी आणि भाजीपाल्यांच्या किमती वाढवल्या. त्यामुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही कर्नाटकात सत्तेत आलो आणि पाचही हमी योजना राबवल्या.

सुरुवातीला या हमी योजनांची अंमलबजावणी होऊ शकली नाही, असा खोटारडा प्रचार भाजपने केला. मात्र हमी योजना लागू झाल्यानंतर त्यांनी नवी टूम काढताना निर्माण केली आहे. आता या पंचहमी योजना बंद होणार असल्याचे सांगत आहेत. आमची हमी कोणत्याही कारणाने थांबणार नाही. काँग्रेसच्या हमी योजनांना पाच वर्षांची हमी आहे. लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकून आपली विराट शक्ती दाखवा.’’

सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विशेष पूजा करून काँग्रेसच्या ‘प्रजाध्वानी यात्रा-२’चा प्रारंभ केला. कुरूडुमले मंदिरातून प्रचाराला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही काँग्रेसने येथूनच आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. नंतर बहुमत मिळवून सरकार स्थापन केले होते. तसेच लोकसभा निवडणुकीतही अधिक जागा जिंकण्याच्या आशेने काँग्रेसने कुरुडुमले गणपती मंदिरापासूनच निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे, असे शिवकुमार म्हणाले. यावेळी काँग्रेस नेते रमेशकुमार, के. एच. मुनिप्पा, बी. के. हरिप्रसाद आदी नेते उपस्थित होते.

नेत्यांचा बसने प्रवास

विशेष म्हणजे सिद्धरामय्या, शिवकुमार यांच्यासह अनेक नेते बंगळूरहून बसने एकत्र आले. कुरुडुमले मंदिरात पूजा केल्यानंतर सर्व नेत्यांनी दर्शनी गेटवर झालेल्या सभेत सहभागी होऊन अधिकृतपणे प्रचाराचे रणशिंग फुंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT