lok sabha election result 2024 public trust in royal families Victory of candidates from various states Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : राजघराण्यांवर जनतेचा विश्‍वास; विविध राज्यांमधील उमेदवारांचा विजय

महाराष्ट्रात भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : यंदाच्या निवडणुकीत भाजपसह विविध राजकीय पक्षांनी राजघराण्यातील लोकांना उमेदवारी दिली होती. यापैकी भाजपच्या तिकिटावर लढलेल्या अनेक उमेदवारांनी चांगले यश मिळविल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे यांचा पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. यंदा मात्र ते विजयी झाले.

त्यांच्याबरोबरच कोल्हापुरातही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनादेखील जनतेने निवडून दिले. मध्य प्रदेशात वडील माधवराव शिंदे यांच्यापासून असलेले काँग्रेसबरोबरील संबंध तोडून २०२० मध्ये भाजपमध्ये दाखल झालेले ग्वाल्हेर घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य शिंदे हे त्यांच्या पारंपरिक गुना मतदारसंघातून निवडून आले आहेत. मागील निवडणूक काँग्रेसकडून लढताना ते याच मतदारसंघातून पराभूत झाले होते.

राजस्थानमध्ये धोलपूर संस्थानचे युवराज दुष्यंत सिंह यांचा झालावार-बारन मतदारसंघातून विजय झाला. ते पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. महाराणा प्रताप यांचे वंशज असलेले विश्‍वराजसिंह मेवाड यांच्या पत्नी महिमाकुमारी मेवाड यांनाही भाजपने उमेदवारी दिली होती.

त्यादेखील राजसमंद मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. दक्षिणेत भाजपने म्हैसूर राजघराण्याचे वारसदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार यांना उमेदवारी दिली होती. अमेरिकेत शिक्षण झालेल्या यदुवीर या ‘लोकाश्रया’ला आलेल्या या नामधारी राजाला जनतेने विजयी केले.

पंधरा मुस्लिम उमेदवारांचा विजय

मागील लोकसभा निवडणुकीमधील ११५ मुस्लिम उमेदवारांच्या तुलनेत यंदा निवडणुकीच्या रिंगणात ७८ मुस्लिम उमेदवार विविध पक्षांकडून रिंगणात होते. यापैकी १५ उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये असदुद्दीन ओवेसी (एमआयएम) व युसूफ पठाण (तृणमूल काँग्रेस) यांची नावे प्रामुख्याने घेता येतील.

राजघराण्यातील प्रमुख विजयी (भाजप)

  • मालविका देवी (कालाहंडी घराणे) कालाहंडी मतदारसंघ, ओडिशा

  • कृतिसिंह देववर्मा (त्रिपुरा घराणे) त्रिपुरा पूर्व मतदारसंघ, त्रिपुरा

राजघराण्यातील प्रमुख पराभूत

  • विक्रमादित्य सिंह, काँग्रेस मंडी मतदारसंघ, हिमाचल प्रदेश

  • राजमाता अमृता रॉय, भाजप कृष्णनगर मतदारसंघ, प. बंगाल

  • प्रणीत कौर (पतियाळा घराणे), भाजप पतियाळा, पंजाब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT