Lok Sabha Election Results Sangli Police esakal
लोकसभा २०२४

Sangli Election Results : मतमोजणीवेळी तब्बल 600 पोलिसांचा कडक बंदोबस्त; मिरवणूक काढण्यास सक्त मनाई, हुल्लडबाजांवरही राहणार नजर

मतमोजणीवेळी (Vote Counting) पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती.

सांगली : ‘‘मतमोजणीवेळी (Vote Counting) पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अप्पर पोलिस अधीक्षकांसह तब्बल सहाशे पोलिस अधिकारी (Sangli Police), कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कालावधीत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल,’’ असा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, मतदारांनी दिलेला कौल मतपेटीतून समोर येईल. त्यानंतर मिरवणूक काढण्यास सक्त मनाई असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. घुगे म्हणाले, ‘‘निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सीमांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात अनेकांवर कारवाईही करण्यात आली. यासह जिल्ह्यातील साडेतीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

त्यानुसार मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. जिल्ह्यात कोठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. सद्य:स्थितीत मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या शासकीय गोदाम परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता मतमोजणीसाठीही पोलिस यंत्रणा सज्ज आहे. पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोठेही कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. निकालानंतर सूचनेनुसार मिरवणूक काढण्यास मनाई आहे.’’

...असा असेल बंदोबस्त

  • अप्पर पोलिस अधीक्षक १

  • पोलिस उपाधीक्षक ३

  • पोलिस निरीक्षक १३

  • सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ६८

  • अंमलदार ४७८

  • वाहतूक पोलिस ३९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

Commonwealth Games 2026: १० पैकी १०! भारताच्या बॉक्सर्सनी इतिहास-भूगोल बदलला; १० 'सुवर्ण' पदकांवर दावा ठोकला... आज फैसला

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT