Narendra Modi sakal
लोकसभा २०२४

PM Modi : ''जम्मू-काश्मीरला मिळणार संपूर्ण राज्याचा दर्जा, लवकरच विधानसभा निवडणुका'' पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

''वर्ष २०१४ मध्ये मी माता वैष्णौ देवीचं दर्शन करुन आलो होतो. त्यावेळी याच मैदानावर मी तुम्हाला गॅरंटी दिली होती की, मागच्या अनेक पिढ्यांनी जे सहन केलंय, त्यातून मुक्ती मिळवून देईल. आज आपल्या आशीर्वादाने मी ती गॅरंटी पूर्ण करुन दाखवली आहे.''

संतोष कानडे

Jammu-Kashmir News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचार दौऱ्यासाठी उधमपूरमध्ये होते. येथे त्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा प्रचार केला. दौऱ्यामध्ये त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरला लवकरच संपूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, असं सांगत येथे निवडणुका होतील अशीही घोषणा केली.

उधमपूर येथे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मी उधमपूर येथे मागच्या अनेक दशकांपासून येत आहे. जम्मू-काश्मीरच्या धर्तीवर माझं येणं-जाणं आजचं नाही. मागच्या पाच दशकांपासून मी येथे येतोय. मला आठवतंय १९९२च्या एकता यात्रेदरम्यान आपण माझं भव्य स्वागत करुन यथोचित सन्मान केला होता. लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावण्याचं माझं स्वप्न होतं. तेव्हा मला इथल्या माता-भगिनींनी खूप आशीर्वाद दिले होते.

ते पुढे म्हणाले की, वर्ष २०१४ मध्ये मी माता वैष्णौ देवीचं दर्शन करुन आलो होतो. त्यावेळी याच मैदानावर मी तुम्हाला गॅरंटी दिली होती की, मागच्या अनेक पिढ्यांनी जे सहन केलंय, त्यातून मुक्ती मिळवून देईल. आज आपल्या आशीर्वादाने मी ती गॅरंटी पूर्ण करुन दाखवली आहे.

''आता तो दिवस दूर नाही जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील.. प्रत्येकजण आपल्या मागण्यांसाठी आमदार-मंत्र्याकडे जावू शकेल. मी तुमच्यासाठी खूप मोठं स्वप्न बघितलं आहे. येथे लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील, शिवाय जम्मू काश्मीरला राज्याच्या दर्जा दिला जाईल.'' असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, दशकानंतर पहिल्यांदा निवडणुका होत आहेत. आता दहशतवाद, दगडफेक, बंदी, गोळीबार हे निवडणुकीचे मुद्दे असणार नाहीत. एक काळ होता जेव्हा अमरनाथ यात्रा असेल किंवा वैष्णौदेवी यात्रा असेल सुरक्षितता नव्हती. आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची कामं होत आहेत, त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत चालला आहे. जम्मू-काश्मीरच्या कोनाकोपऱ्यातून एकच आवाज येतोय, फिर एक बार मोदी सरकार.. असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT