Lok Sabha Electoral Roll  Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Electoral Roll : नाव वगळलेल्यांना भरावा लागेल फॉर्म नंबर सहा

उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती; आचारसंहितेनंतर वेबसाइट

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मतदार यादीत नावच नसल्याने किंवा जिवंत असूनही मतदार यादीत मयत म्हणून नोंद झाल्याने अनेकांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही. आता अशा मतदारांना ४ जूननंतर ‘वोटर हेल्पलाइन’वर फॉर्म नंबर सहा भरून द्यावा लागणार आहे. त्यानंतरच त्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत.

सोलापूर व माढा लोकसभा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील अनेकांना ७ मे रोजी मतदान करता आले नाही. मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे, मागच्यावेळी मतदान केले, पण यंदा यादीत नावच नव्हते. दुसरीकडे अनेकांना मी जिवंत आहे, तुमच्यासमोर उभा असलेला तो मीच आहे, असे ठणकावून सांगावे लागले.

मात्र, नियमानुसार त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अशा शेकडो मतदारांना मतदान न करताच परतावे लागल्याचे ७ मे रोजी पाहायला मिळाले. तसे आरोप देखील अनेकांनी केले व जिल्हा प्रशासनाकडे काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या.

आता ती नावे नेमकी मतदार यादीतून वगळलीच कशी, जिवंत असतानाही मतदार यादीत मयत म्हणून नोंद लागली कशी, या बाबींची चौकशी होणार आहे. तरीपण, यादीतून वगळलेल्या मतदारांना पुन्हा यादीत येण्यासाठी फॉर्म सहा भरावाच लागणार आहे.

दोन कागदपत्रे अपलोड केल्यास ७ दिवसांत समाविष्ट होईल नाव

ज्यांचे नाव मतदार यादीतून वगळले गेले आहे किंवा जिवंत असूनही मयत नोंदविण्यात आले आहे, त्यांनी स्वत:चे आधारकार्ड किंवा जन्माचा एक पुरावा आणि रहिवासी पुरावा (वीजबिल किंवा इतर) वोटर हेल्पलाइन या संकेतस्थळावर अपलोड करावा. त्यानंतर सात दिवसांत संबंधित मतदाराचे नाव नव्याने समाविष्ट होते. पण, ही सुविधा ४ जूननंतर (लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आचारसंहिता संपल्यावर) सुरु होणार आहे.

मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारींची पडताळणी केली जाणार आहे. पण, मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आचारसंहिता संपल्यानंतर ‘वोटर हेल्पलाइन’ या संकेतस्थळावर जावून फॉर्म नं. सहा भरून पुन्हा यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Asia crisis : महागाई वाढणार! आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ, युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसणार, जहाज वाहतुकीचा खर्च वाढला

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

SCROLL FOR NEXT