Rahul Gandhi and Narendra Modi
Rahul Gandhi and Narendra Modi sakal
लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : कसं आहे जम्मूचं राजकारण? जुगलकिशोर शर्मांचा सामना रामबन भल्लांशी

सकाळ वृत्तसेवा

जम्मू: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उधमपूर येथे शांततेत मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष जम्मू मतदारसंघाकडे लागले आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येथे २६ तारखेला मतदान होणार आहे. खोऱ्यात विशेष अस्तित्व नसलेल्या भाजपने जम्मूमध्ये मात्र जुगलकिशोर शर्मा यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले असून त्यांचा सामना ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार रामबन भल्ला यांच्याशी होणार आहे.

जम्मू लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जम्मू, सांबा, रियासी जिल्ह्यांसह राजौरी जिल्ह्याचा काही भाग येतो. जुगलकिशोर शर्मा आणि भल्ला यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात आहेत. यात बहुजन समाज पक्षाचे जगदीश राज आणि सनातन भारत दलाचे अंकुर शर्मा यांचा समावेश आहे. उधमपूरमध्ये ६८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचाही उत्साह वाढला आहे.

राजकीय पक्षांनीही जम्मूमधील प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक स्थानिक नेते जम्मूमध्येच ठाण मांडून बसले असून कार्यकर्ते घरोघरी जात प्रचार करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची १६ एप्रिलला येथे सभा झाली होती, तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही मागील महिन्यात येथे रोड शो केला होता. जुगलकिशोर शर्मा हे २०१४ आणि २०१९ ची निवडणूक जिंकली होती. मागील निवडणुकीत त्यांनी भल्ला यांचाच पराभव केला होता. त्यामुळे यंदाही त्याच विजयाची पुनरावृत्ती करत हॅट्‌ट्रिक साधण्याची त्यांना अपेक्षा आहे.

कलम ३७० हटवून जम्मू-काश्‍मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये रूपांतर झाल्यानंतर येथे प्रथमच लोकसभा निवडणूक होत आहे. मोदींची विकास कामे, कलम ३७०, दहशतवादावर वचक हे भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दे आहेत. काँग्रेसचे नेते असलेल्या भल्ला यांना यंदा नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे पाठबळ आहे. त्यामुळे भाजपच्या कारभाराला कंटाळलेली जनता यंदा आपल्या पारड्यात विजयाचा माप टाकेल, असा भल्ला यांना विश्‍वास आहे. सचिन पायलट यांच्यासह अनेक नेत्यांनी जम्मूमध्ये प्रचारदौरे काढत वातावरण तापविले आहे.

जम्मू मतदारसंघ

मतदार : १७,८०,७३८

पुरुष : ९,२१,०५३

महिला : ८,५९,६९७

मतदान केंद्र : २,४१६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT