Narendra Modi esakal
लोकसभा २०२४

Narendra Modi : ''लोकांनी शहजादेंना आधीच नाकारले'', अमरोहातील सभेतून पंतप्रधानांचा घणाघात

सकाळ वृत्तसेवा

अमरोहा (उत्तरप्रदेश)ः ‘सध्या उत्तरप्रदेशात ‘दो शहजादे की जोडी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असले तरीसुद्धा लोकांनी मात्र हा सिनेमा कधीच नाकारला आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला.

ते येथे आयोजित सभेत बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘ ही मंडळी नेहमीच उत्तरप्रदेशातील जनतेकडे मते मागण्यासाठी येतात पण प्रत्यक्षात मात्र तेच घराणेशाही, भ्रष्टाचार आणि लांगूलचालन या प्रोत्साहन देण्याचे काम करतात.’’ मोदींनी यावेळी स्थानिक उमेदवार दानिश अली यांच्यावरही टीका केली. दानिश यांनीच भारत मातेच्या जयघोषाला आक्षेप घेतला होता असे मोदी म्हणाले.

‘‘ जी व्यक्ती भारत मातेच्या जयघोषालाच आक्षेप घेते ती संसदेमध्ये शोभून दिसेल का? अशा लोकांना आपण संसदेमध्ये जाऊ द्यायला हवे का? ’’ असे सवाल पंतप्रधानांनी उपस्थितांना केले. मोदी म्हणाले, ‘‘ समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी देखील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले होते. केवळ मतपेढीवर लक्ष ठेवून असलेल्या या मंडळींनी रामाला विरोध केला होता. दुसऱ्या बाजूला ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीच्या बाजूने युक्तिवाद केला होता ती मंडळी मात्र या सोहळ्याला उपस्थित होती. विरोधकांचे निमंत्रण नाकारून देखील समाधान झाले नाही. त्यामुळेच त्यांनी राम मंदिर आणि सनातन धर्माचा अवमान केला. समाजवादी पक्षाने मतपेढीसाठी रामभक्तांना पाखंडी म्हटले. इंडिया आघाडीत असलेली मंडळी सनातन धर्माचा द्वेष करतात.’’

त्यांच्याकडून कृष्णाचा अवमान

‘‘ सध्या समुद्रातळाशी असलेल्या कृष्णभूमी द्वारकेला जाऊन मी प्रार्थना केली तेव्हा काँग्रेसच्या युवराजांनी समुद्राखाली प्रार्थना करण्यासाठी काहीही नसल्याचे नमूद केले होते. केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी ते आता आमच्या श्रद्धेला देखील नाकारत आहेत,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘‘ सध्या बिहारमध्ये जे सत्तेत आहेत ते स्वतःला यदुवंशीय म्हणवितात. उत्तरप्रदेशातील काही मंडळी त्याचाच फायदा घेतात मग ही मंडळी कृष्णाचा अवमान करणाऱ्याशी कशी काय मैत्री करू शकतात?’’ असा सवालही पंतप्रधानांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule From 1 August: 1 ऑगस्टपासून बदलणार अनेक नियम! LPG, रेल्वे तिकीट, बँकिंगसह 'हे' 5 मोठे बदल जाणून घ्या

IND vs SL Test : जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार? प्रमुख गोलंदाजाचा फिटनेस अहवाल आला समोर; नेमकं काय आहे त्यात?

महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर व्हायब्रेटर ठेवणं, हा बलात्कारच! केरळ उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, आरोपीची शिक्षा कायम...

Farmer Loan: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! कर्जमाफीच्या रकमेबाबत मोठे स्पष्टीकरण; संभ्रम कायमचा दूर, प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती

Latest Marathi News Live Update : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT