Priyanka Gandhi admitted to hospital 
लोकसभा २०२४

Lok sabha election 2024 : शहजादे विरुद्ध शहेनशाह! मोदींच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा

बनासकांठा (गुजरात)ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर ‘शहजादे’ अशा शब्दांत टीका केल्यानंतर काँग्रेसकडून त्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांनी पंतप्रधान मोदी हे शहेनशाह असून ते प्रासादामध्ये राहतात असा आरोप करताना त्यांचा लोकांशी असलेला संपर्क तुटला असल्याचा घणाघात केला. त्या गुजरातच्या बनासकांठा मतदारसंघातील लखानी येथे आयोजित सभेत बोलत होत्या.

प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘‘ माझ्या भावाला ते शहजादा असे म्हणतात पण मी त्यांना सांगू इच्छिते की त्याच शहजाद्याने कन्याकुमारी ते काश्मीर असा चार हजार किलोमीटरचा प्रवास केला. राहुल भारत जोडो यात्रेदरम्यान शेतकरी, कामगारांना भेटले त्यांनी इतरांच्या समस्या जाणून घेतल्या. मोदींसारखा शहेनशाह मोठ्या प्रासादात राहतो.

तुम्ही त्यांना कधी टीव्हीवर पाहिले आहे का? त्यांचे कपडे स्वच्छ असतात. धुळीचा एक कणही त्यांच्या कपड्यावर नसतो. एकही केस विस्कटलेला नसतो. हा माणूस तुमचे दुःख कसे काय समजू शकेल? तुमची शेती यांना कशी काय कळेल? तुमच्या समस्या त्यांना कशा काय समजतील? आज तुम्हाला प्रचंड महागाईला सामोरे जावे लागते त्याचे दुःख त्यांना कसे कळू शकेल ?

भाजपला या देशाची राज्यघटना बदलायची आहे. जनतेला जे अधिकार मिळाले आहेत त्यांना कात्री लावत त्यात कपात करायची आहे. आज सुरू असलेले राजकारण तुमच्या लक्षात आले तर पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये लोकांचे अधिकार कशा पद्धतीने कमकुवत केले हे समजू शकेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT