लोकसभा २०२४

Lok sabha election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये काय होणार? कमळ फुलणार की मशाल पेटणार? जाणून घ्या राजकीय परिस्थिती

Sandip Kapde

मुंबईः शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये यावर्षी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत गेल्या दोन टर्म येथे खासदार आहेत. या मतदारसंघवरून भाजप आणि शिंदे गटात चर्चा बरीच लांबली आणि शेवटी शिंदे गटापासून रत्नागिरी सिंधुदुर्ग खेचण्यात भाजपला यश आलं. भापकडून नारायण राणे निवडणूक लढणार आहेत. मात्र त्यांच्यासाठी ही निवडूक फार सोपी नाही. कारण राणे यांचं सिंधुदुर्गमध्ये वर्चस्व आहे पण रत्नागिरी हा विनायक राऊत यांचा गड आहे. येथील जुना मतदार त्यांना मानणारा आहे. मात्र शिवसेना फुटीचा फायदा झाला तर नारायण राणे देखील कमळ फुलवू शकतात, अशी एकंदरीत परिस्थिती आहे.

40 वर्षात पहिल्यांदा कमळावर निवडणूक

2009 मध्ये या मतदार संघात निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र 2014 आणि 2019 ला राऊत यांनी गड जिंकला. निलेश यांचा आक्रमक स्वभाव नडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

नारायण राणेच का?

नारायण राणे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला नडण्यासाठी राणेंशिवाय भाजपकडे पर्याय नव्हता. तर निलेश राणे यांची यापूर्वी भरसभेत एका समाजाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर नाराजी आहे. वडील चांगले पण मुलं संयमी नाहीत, अशी भावना मतदारांची आहे.

स्थलांतर मोठा मुद्दा

रोजगार नसल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील अनेक तरुण पुणे मुंबईला कामाला जातात. स्थानिक उद्योग बंद पडले. गुहागर यथे होणारा कोकोकोला प्रकल्प देखील प्रलंबित आहे. नाणार देखील रखडला. यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर वाढलं.

कोकणातील शेवटची पिढी संपली तर...

पुणे-मुंबईमध्ये असलेले कोकणी लोक सणोत्सवाला कोकणात येतात. घरी आई-वडील असले तर त्यांना बँक ट्रान्स्फरने पैसे पाठवतात. त्यामुळे कोकणातील शेवटची पिढी संपली तर कोकणात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असं लोक बोलतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT