Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : भाजपच्या प्रचारात आरक्षणाचे वारे ; धार्मिक निकषावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

मोदींच्या विकासाची गॅरंटी देत सुरू झालेला भाजपचा प्रचार व्हाया हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आरक्षणावर येऊन ठेपला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली / अकोला : मोदींच्या विकासाची गॅरंटी देत सुरू झालेला भाजपचा प्रचार व्हाया हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आरक्षणावर येऊन ठेपला आहे. राजस्थानातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी आज काँग्रेस धर्माच्या आधारावर आरक्षणात वाढ करण्याचा विचार करत असून अनुसूचित जाती-जमातींचे (एससी-एसटी) आरक्षण काढून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा डाव असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अकोल्यातील सभेत तोच धागा पकडून एससी-एसटी आणि ओबीसींचे आरक्षण काढले जाणार नाही ही मोदींची गॅरंटी असल्याचे नमूद केले. मोदी आणि शहा यांच्या विधानामुळे भाजपच्या प्रचारात आरक्षणाचे वारे वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी काँग्रेसने देशातील आरक्षण व्यवस्था संपविण्याचा भाजपचा कट असल्याचा आरोप केला होता.

सर्वपक्षीय प्रचाराचा धुरळा

मंगळवार हा राज्यातील ‘प्रचार डे’ ठरला. सर्वपक्षीय नेत्यांनी जोर लावल्याने राज्यभर प्रचाराचा धुरळा उडाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तोफा विविध ठिकाणावर धडाडल्या. उद्या बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपत असून शुक्रवारी (ता.२६) पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम आणि मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा आठ मतदारसंघांत मतदान होत आहे.

ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. लोकशाही वाचविण्यासाठी महाविकास आघाडीच्या मागे ताकद उभी करा. परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अबाधित राहीन. परभणी पैशाने विकत घेतली जाऊ शकत नाही. वादाला अंगावर घेण्यासाठी मर्दाची छाती लागते ती आमच्याकडे आहे.

- उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख (परभणीतील सभेतून)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT