लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर शंकरबाबा पापळकर साठ मुलांसह सर्वात आधी मतदान केंद्रावर

सकाळ वृत्तसेवा

राज इंगळे

अचलपूर : अमरावती लोकसभा निवडणुकीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्‍या अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृहातील ६० मुलांसह सर्वांत आधी वझ्झर येथील प्राथमिक शाळेच्‍या २१५ क्रमांकाच्‍या मतदानकेंद्रावर पोहोचून मतदानाची सुरुवात केली. मी दिव्यांग मुलांसह मतदान केले, आपणही मतदान करायला जा, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांनी केले.

अनाथांचे नाथ १२५ मुलांचे बाप ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर आपल्‍या ६० मुलांसह वझ्झर येथील प्राथमिक शाळेच्‍या २१५ क्रमांकाच्‍या मतदानकेंद्रावर पोहोचले आणि या सर्वांनी मतदानाचा हक्‍क बजावला.

यामध्ये दृष्टिहीन, मूकबधीर व पोलिओग्रस्त मुलांचासुद्धा समावेश आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून ही मुले या बालगृहात राहत आहेत. सर्वांच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर हेच नाव आहे. आपल्या मुलांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठीसुद्धा त्यांनी लढा दिला.

गेल्‍या लोकसभा निवडणुकीत येथील ४८ मुलांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. यावेळी सुद्धा ६० मुलांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शंकरबाबा यांनी यावेळी मतदान जनजागृतीसाठीही प्रयत्‍न केले. प्रत्‍येकाने लोकशाही समृद्ध करण्‍यासाठी मतदानाचा हक्‍क बजावला पाहिजे, असे आवाहन शंकरबाबा पापळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : अभिनेता सोनू सूद पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी अमृतसर विमानतळावर दाखल

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होणार? अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी

SCROLL FOR NEXT