Prakash Ambedkar Sakal
लोकसभा २०२४

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीची सहावी यादी जाहीर; चर्चेतल्या मतदारसंघात 'या' चेहऱ्यांना संधी

संतोष कानडे

मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने सातारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत रघुनाथ कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी घोषित केली आहे.

तसेच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने यवतमाळ-वाशिम येथील समनक जनता पक्षाचे अनिल जयराम राठोड यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

'वंचित' अन् एमआयएम एकत्र येणार?

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी संभाजीनगरच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची मोठी घोषणा केलीय. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा, द्या असं जाहीर आवाहन औवेसींनी केलंय. त्यांच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा आंबेडकर आणि औवेसींची युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मोदींची भूमिका हिटलरसारखी- प्रकाश आंबेडकर

नरेंद्र मोदी यांची भूमिका हिटलरसारखी असून त्याचपद्धतीने त्यांची वाटचाल आहे. मोदींना थांबवण्याची हीच वेळ असून लोकसभा निवडणूकीत भाजपाला त्यांची जागा दाखवा असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT