लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : तृतीयपंथी नागरिकांच्या मतांचा टक्का का वाढत नाही? रंजिता सिन्हा म्हणाल्या....

रांगेतील अनेक लोक त्यांच्याकडे संशयाने पाहतात, त्यांना समानतेची वागणूक देत नाहीत. हा सर्व प्रकार अत्यंत अवमानास्पद असल्यानेच तृतीयपंथी नागरिक रांगेत उभे राहून मतदान करण्याचे टाळतात, असे सामाजिक कार्यकर्त्या रंजिता सिन्हा यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : विधानसभा असो वा लोकसभा, मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र हमखास दिसते. या रांगेत तृतीयपंथी नागरिक मात्र अभावानेच दिसतात. रांगेत उभे राहिल्यास इतर लोक अपमान करतात, त्यामुळे रांगेत उभे राहण्यास तृतीयपंथी नागरिक अनुत्सुक असल्याचे दिसून आले आहे.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानासाठी आलेल्या तृतीयपंथी नागरिकांना अनेकदा मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारातच अडविले जाते. त्यांच्याकडून वारंवार ओळखपत्राची मागणी केली जाते. वैध कागदपत्रे असतानाही मतदार याद्यांमध्ये त्यांची नावे नसतात. या अडचणींमधूनही मार्ग काढत तृतीयपंथी नागरिक मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहिले तर त्यांना अपमानाला सामोरे जावे लागते.

रांगेतील अनेक लोक त्यांच्याकडे संशयाने पाहतात, त्यांना समानतेची वागणूक देत नाहीत. हा सर्व प्रकार अत्यंत अवमानास्पद असल्यानेच तृतीयपंथी नागरिक रांगेत उभे राहून मतदान करण्याचे टाळतात, असे सामाजिक कार्यकर्त्या रंजिता सिन्हा यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाकडे तृतीयपंथी मतदारांची संख्याही प्रत्यक्ष संख्येपेक्षा प्रचंड कमी असल्याचा दावा सिन्हा यांनी केला. पश्‍चिम बंगालमध्येच चाळीस ते पन्नास हजार तृतीयपंथी मतदार असताना निवडणूक आयोगाकडे मात्र केवळ १८३७ जणांची नोंद आहे. महिलांना, ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना मतदान केंद्रावर जशी सहानुभूती मिळते, त्यांना सोयीसुविधा पुरविल्या जातात, तशीच सहानुभूती आम्हालाही मिळायला हवी, अशी मागणी सिन्हा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT