Maharashtra Lok Sabha Result 2024 esakal
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Result 2024 : शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीपुढे भाजपची दाणादाण; पश्चिम महाराष्ट्रातली 'खेळी' काय?

अजित पवार वगळून राष्ट्रवादी काँग्रेस काय असणार या प्रश्नाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुत्सद्दी राजकारणाने चोख उत्तर दिले. शरद पवार यांनी अत्यंत नियोजनबद्ध बांधलेली मोट या पाचही मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी पोषक ठरली.

संभाजी पाटील

Sharad Pawar lok sabha election 2024 : फोडाफोडीच्या राजकारणाला आणि सत्तेच्या उन्मादाला अत्यंत नियोजनबद्ध राजकीय व्यूहरचना आखून दिलेले उत्तर, दलित-मुस्लिम समाजाने घेतलेली ठाम भूमिका आणि जनतेच्या मनात असलेल्या बदलाला घातलेली फुंकर यामुळे अपेक्षेप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात भाजप महायुतीच्या विजयाचा वारू महाविकास आघाडी रोखण्यात यशस्वी झाली. साताऱ्यातील निसटत्या विजयाने भाजपची लाज राखली असली तरी महाविकास आघाडीने केलेले 'कमबॅक' महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारं ठरणार आहे.

भाजपचे भक्कम केडर, राज्यात आणि केंद्रात असलेल्या सत्तेची अमर्याद ताकद, फोडाफोडीच्या राजकारणात क्षीण केलेली मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा जमेच्या बाजू असतानाही पश्चिम महाराष्ट्रात भाजपची दैना उडाली. नगर, शिर्डी, माढा, सोलापूर आणि सातारा या पाच जागांपैकी केवळ एक साताऱ्याची जागा शेवटच्या क्षणी भाजपला जिंकता आली. २०१९ मध्ये या पाच जागांपैकी नगर, सोलापूर, माढा या तीन जागा भाजपने जिंकून आणल्या होत्या. तर शिर्डी ही जागा त्यावेळच्या शिवसेना- भाजप युतीला मिळाली होती. सातारची जागा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली होती. भाजपची अशी काही भक्कम स्थिती असतानाही या पक्षाला मतदारांनी कात्रजचा घाट दाखवला आहे. या पाच जागांपैकी भाजपने चार जागा लढविल्या होत्या तर शिवसेना (शिंदे) यांना शिर्डीची जागा दिली होती.

अजित पवार वगळून राष्ट्रवादी काँग्रेस काय असणार या प्रश्नाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुत्सद्दी राजकारणाने चोख उत्तर दिले. शरद पवार यांनी अत्यंत नियोजनबद्ध बांधलेली मोट या पाचही मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी पोषक ठरली. अहमदनगर मध्ये विखे-पाटील यांचे साम्राज्य सर्वसामान्यांचा उमेदवार अशी ओळख बनलेल्या नीलेश लंके यांनी उद्ध्वस्त केले. लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवारांच्या हाकेला ओ दिली. लंके यांचा जनसंपर्क त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला. याउलट डाॅ. सुजय विखे-पाटील यांना पाच वर्षे जनतेपासून अलिप्त राहिल्याचा फटका बसला. सत्तेचा उन्माद, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे या मतदारसंघात भाजपला महाग पडले. शिर्डी मध्येही सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेची सोडलेली साथ आणि जनतेशी तुटलेली नाळ मतदारांना आवडली नाही. विखे यांच्याविषयी असणारा रागही भाऊसाहेब वाघचौरे यांच्या फायद्याचा ठरला.

सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढला. भाजपचे राम सातपुते यांना बाहेरचा उमेदवार ही प्रतिमा शेवटपर्यंत बदलता आली नाही. वंचित आघाडीने न दिलेला उमेदवार, दलित-मुस्लिम मतदारांची एकगठ्ठा मिळालेली साथ आणि भाजपमधील अंतर्गत गटबाजी यामुळे भाजपचा पराभव झाला. नगरप्रमाणेच सोलापूर मध्येही काॅंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची मोट चांगली बांधली गेली.

सर्वात कलाटणी नेणारी निवडणूक झाली ती माढ्यातील. विरोधकांना उमेदवार नाही अशी सुरुवातीची स्थिती असताना शरद पवार यांनी सर्व गणिते जुळवून आणली. मोहिते पाटील घराण्याला पवारांनी बळ दिले. कागदोपत्री रणजितसिंह निंबाळकर यांची स्थिती भक्कम असतानाही त्यांना नाराजीचा फटका बसला. माढा हा शरद पवारांना मानणारा मतदार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. संभाजी ब्रिगेड चे प्रवीणदादा गायकवाड यांनी पडद्यामागे राहून मोहिते पाटील यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

भटकता आत्मा, नकली शिवसेना ही नरेंद्र मोदी यांची टीका, त्यांच्या सभांपेक्षाही जनतेने भाजपच्या विरोधात हातात घेतलेली निवडणूक या ठिकाणी दिसून आली.

या सर्व निवडणुकीत सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा गट थोडक्यात ढासळला. शेवटच्या क्षणी भाजपचे उदयनराजे भोसले यांनी विजय खेचून आणला. तुतारी समान असलेल्या ट्रम्पेट हे चिन्ह असणाऱ्या उमेदवाराला ३६ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. कराडमधून शशिकांत शिंदे यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. या एका जागेने भाजपला तारले. मात्र ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली आहे, ती पाहता विधानसभा निवडणूक सोपी नाही हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT