Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडी आज भूमिका मांडणार ; उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला जेरीस आणल्याची चर्चा

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेली सुंदोपसुंदी कायम ठेवून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असल्याची घोषणा करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मंगळवारी (ता.९) संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरे जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेली सुंदोपसुंदी कायम ठेवून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असल्याची घोषणा करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मंगळवारी (ता.९) संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरे जात आहेत. सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसकडून रात्री उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र ठाकरेंनी कानावर हात ठेवल्याने अखेरीस काँग्रेस ‘बॅकफूटवर’ आल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीच्या

संयुक्त पत्रकार परिषदेला उद्या शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. आघाडीबरोबर इतर घटकपक्षही बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र डाव्या पक्षांना राज्यातील एकाही लोकसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व न दिल्याने त्यांनी या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे ते या पत्रकार परिषदेला येण्याची शक्यता नाही.

काँग्रेस दुखावली

‘खासदार संजय राऊत यांनी सांगलीतील सभेत काँग्रेसच्या नेत्यांनी ‘नौटंकी’ बंद करावी,’ अशी शेरेबाजी केल्याने काँग्रेस दुखावली आहे. त्याचे पडसाद येत्या काही दिवसांत उमटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT