Lok Sabha Poll 2024 Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Poll 2024 : महायुतीमध्ये पाच जागा ठरत आहेत वादाचे कारण, या चेहऱ्यांबाबत होणार फेरविचार?

भाजप-शिंदे गट-अजित पवार गटाच्या महायुतीने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकणे आवश्यक असल्याने काही चेहरे बदलायचे का?, याबद्दल विचार सुरू असल्याचे समजते.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : भाजप-शिंदे गट-अजित पवार गटाच्या महायुतीने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकणे आवश्यक असल्याने काही चेहरे बदलायचे का?, याबद्दल विचार सुरू असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ४० च्या वर आमदारांना फोडून शिवसेनेतून बाहेर पडले आहेत.

त्यांच्या या लोकप्रियतेत तसेच नेतृत्वात लोकसभेच्या निकालांनी भर घालावी. त्यासाठी काही बाबींचा त्यांनी सारासार विचार करून निर्णय बदलावेत असे भाजपचे म्हणणे आहे. शिवसेना शिंदे गटाला योग्य त्या जागा देण्यास विरोध नाही, फक्त उमेदवाराच्या जिंकण्याची शाश्वती आहे का हे लक्षात घेणे आवश्यक आहे हेही लक्षात घेणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.

या पूर्वी घोषित झालेले काही उमेदवार खरोखरच योग्य आहेत का, याचा विचार करण्याचे सुचवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

पाच जागांचा आग्रह

भाजप सातारा जागेबद्दल आग्रही आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण यांच्यापेक्षा नारायण राणे जिंकण्याची शक्यता जास्त आहे. ठाण्यासाठी आग्रह धरताना नवी मुंबई परिसरातील मते मिळतील का याचाही अंदाज घ्या असे सांगत पालघरसाठी उमेदवार भाजपने दिला होता याकडेही लक्ष वेधण्यात आल्याचे समजते. नाशिक आणि धाराशिव या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. या पाचही जागांबाबत शिंदे गट आग्रही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT