Mallikarjun Kharge sakal
लोकसभा २०२४

Mallikarjun Kharge : देशात परिवर्तन आणणारी निवडणूक ;मल्लिकार्जुन खर्गे

‘‘लोकसभेची यंदाची निवडणूक देशात परिवर्तन आणणारी असून, भाजपचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मते दिली तर पुढची पिढी गुलामगिरीत असेल,’’ असे विधान करत ‘संविधान वाचले, तरच देश वाचेल’, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी शिंदखेडा येथे मांडली.

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे (धुळे) : ‘‘लोकसभेची यंदाची निवडणूक देशात परिवर्तन आणणारी असून, भाजपचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मते दिली तर पुढची पिढी गुलामगिरीत असेल,’’ असे विधान करत ‘संविधान वाचले, तरच देश वाचेल’, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी शिंदखेडा येथे मांडली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ खर्गे यांची सभा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस सचिव आशिष दुआ, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना खर्गे म्हणाले, ‘‘भाजप व आरएसएस ही निवडणूक लढवत असून राज्यघटना बदलण्यासाठी, याकामी बहुमतासाठी चारशे पारचा नारा ते देत आहेत.

पंतप्रधान मोदी प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होते. त्याचे काय झाले? काँग्रेसने २५ योजनांचा जाहीरनामा दिला आहे. त्यात महिलांना ८५०० रुपये दरमहा देण्यात येणार आहे.’’ ‘‘मोदी सरकारकडून सरकारी यंत्रणेचा वारेमाप गैरवापर झाला असून कारवाईच्या भीतीने अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदेंनी लोटांगण घातले.

काँग्रेस देशासाठी लढला, अनेक जण फासावर गेले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व देशाला स्वातंत्र मिळवून दिले. भारतीय जनता पक्षाने देशासाठी काय केले,’’ असा प्रश्‍न खर्गे यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarparishad Election : राज्यातल्या २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु; तगडा पोलिस बंदोबस्त, यंत्रणा अलर्ट

आजचे राशिभविष्य - 02nd December 2025

माझ्यावर टाकलेली धाड कटकारस्थानातून: शहाजी पाटील; पालकमंत्री अन् माजी आमदाराबाबत माेठे वक्तव्य, अश्रू अनावर !

Winter Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा आलू मेथी पराठा, सोपी आहे रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 December 2025

SCROLL FOR NEXT