Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : काँग्रेस मित्रपक्षांसाठी प्रसंगी स्वतःच्याही जागा सोडणार ; मॅथ्यू अँटनी : लोकसभेसाठी रणनीती

लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी काँग्रेस आवश्यक तेवढा त्याग करेल, प्रसंगी मित्रपक्षांसाठी स्वतःच्या जागाही सोडायला तयार आहे, असे अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मॅथ्यू अँटनी यांनी शनिवारी (ता. २३) येथे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

कोहिमा : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी काँग्रेस आवश्यक तेवढा त्याग करेल, प्रसंगी मित्रपक्षांसाठी स्वतःच्या जागाही सोडायला तयार आहे, असे अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मॅथ्यू अँटनी यांनी शनिवारी (ता. २३) येथे सांगितले. कोहिमा येथील काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत अँटनी बोलत होते. ते म्हणाले, की राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर पक्षाला देशभरातील लोकांकडून पाठिंबा मिळत आहे.

पक्षासाठी हा कठीण काळ आहे, तथापि देशातील लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे. लोकसभेसाठी काँग्रेस आवश्यक तेवढा त्याग करण्यास तयार आहे. आमची संसाधनांची कमतरता आम्हाला लोकांच्या पाठिंब्याने खऱ्या भावनेने निवडणूक लढण्यापासून रोखणार नाही. सरकार आपल्या प्रचारात अडथळा आणण्यासाठी काँग्रेसची बँक खाती गोठवत असल्याचा आरोप त्यांनी केला. अँटनी म्हणाले, की काँग्रेस संविधानाने दिलेले स्वातंत्र्य कायम राखेल.

जर ‘इंडिया आघाडी’ सत्तेवर आली तर भाजपच्या सत्ताकाळात वाढीस लागलेल्या महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यांना प्राधान्य देईल. आम्ही लोकांच्या चिंतेकडे लक्ष देऊ आणि शेतकऱ्यांसाठी ‘एमएसपी’ची हमी देऊ, ३० लाख नोकऱ्यांची हमी देऊ आणि तरुण, महिलांच्या फायद्यासाठी विविध योजना लागू करू. तसेच काँग्रेसने नेहमीच आश्वासनांची पूर्तता केली आहे, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT