Milind Deora 
लोकसभा २०२४

Milind Deora: दक्षिण मुंबईशी भावनिक नाते, मी अजूनही लढण्यास इच्छुक, मुलाखतीतून देवरांनी व्यक्त केली भावना

Loksabha 2024: दक्षिण मुंबई ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. माझे वडील मुरलीभाई देवरा यांच्यापासून आम्ही राजकारणात सक्रिय राहून काम करतोय. यामुळे या मतदारसंघाशी माझे भावनिक नाते आहे.

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मिलिंद तांबे

दक्षिण मुंबई ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. माझे वडील मुरलीभाई देवरा यांच्यापासून आम्ही राजकारणात सक्रिय राहून काम करतोय. यामुळे या मतदारसंघाशी माझे भावनिक नाते आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आजही मी इच्छुक आहे. मात्र, याचा सर्वश्री निर्णय आमचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यायचा आहे, असे मत शिवसेनेचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले.

दक्षिण मुंबईसाठी काँग्रेस आग्रही नव्हती म्हणून आपण पक्षांतर केलं हे खरं आहे का?

माझे वडील मुरलीभाई १९६८ पासून सक्रिय राजकारणात होते. १९८० पासून त्यांनी लोकसभेत काम करणे सुरू केले. त्यानंतर मला मोठी संधी मिळाली. ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ची कल्पना ही माझीच आहे. माझ्याच प्रयत्नाने ही योजना सर्वप्रथम दक्षिण मुंबईत लागू झाली; पण काँग्रेस या जागेसाठी फारशी आग्रही नव्हती, हे खरे आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकांमध्ये जाऊन काम करण्याची पद्धत मला भावली. त्यांनी मला काम करण्याची संधी दिल्याने मी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला.

ही जागा भाजप किंवा मनसेकडे जाईल, असे दिसते?

ही जागा शिवसेनेची आहे. जिथे ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या जागा त्या त्या पक्षांकडे राहतील. हा आमचा बालेकिल्ला आहे. मात्र, मनसेबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील.

या मतदारसंघातील कधीकाळी तुमच्यासोबत असणारा अल्पसंख्याक व मराठी माणूस शिवसेनेकडे कसा वळणार?

गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात मी काम करतोय. शिवडी, वरळी, भायखळा, चिंचपोकळी, घोडपदेव, गिरगाव येथील चाळींमध्ये मराठी टक्का मोठ्या प्रमाणात आहे. दुसऱ्या बाजूला मुस्लिम, व्यापारी, उच्चभ्रू वस्ती आहे. या लोकांनी माझे काम पाहिले आहे. पुनर्विकासाच्या अनेक कामांना मी चालना दिली आहे. धनुष्यबाण येथील घराघरात पोहोचला आहे. लोक माझ्यामागे शंभर टक्के उभे राहतील.

महायुतीत जागावाटपावरून घासाघीस सुरू आहे. हक्काच्या जागा राखणे शिंदे गटाला कठीण जात आहे, असे चित्र आहे?

महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. सर्व नेत्यांमध्ये ट्युनिंग फार चांगले आहे. यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही. सर्व ठिकाणी योग्य उमेदवार दिला जाईल.

भाजपकडून अनेक ठिकाणी तुमच्या पक्षाचे उमेदवार बदलण्याचा आग्रह सुरू आहे?

महायुतीमध्ये अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यातील योग्य उमेदवार देण्याबाबत चर्चा सुरू आहे. इच्छुक खूप असले तरी प्रत्येक निवडणुकीत नवीन समीकरणे समोर असतात. त्याचा विचार करून जो चांगला उमेदवार असेल त्यासाठी आग्रह केला जात आहे.

मुंबईत शिवसेनेचे तीन खासदार आहेत. त्या तीनही जागा शिवसेनेला मिळतील का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीमधील सर्वोच्च नेते आहेत. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचे आहे. त्यांच्यासाठी सर्व लोक एकत्र येतील. प्रत्येक जागेवर मोदी निवडणूक लढवत आहेत, असे आम्ही मानतो. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील सर्वसामान्य लोकांमधील मुख्यमंत्री आहेत. ते वेगवान आणि २४ तास काम करत आहेत. लोकांसाठी उपलब्ध आहेत. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जिंकून देणे, हे आमचे लक्ष आहे.

स्टार प्रचारक म्हणून आपण दिसणार का?

मी मुंबईकर असलो तरी राज्यातच नाही तर देशभर काम केले आहे. तो अनुभव यावेळी मला कामी येईल. मी महायुतीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहे. त्यामुळे वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.

मुंबईच्या विकासाचे कोणते मॉडेल आपल्याकडे आहे?

विकासाचा मॉडेल हाच आमचा अजेंडा आहे. मुंबईसारख्या शहरात परवडणारी घरे देणे, हे आमचे ध्येय आहे. मराठी माणसाला स्थिर करण्यासाठी त्यांना कायमचे घर देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. यासाठीच समूहविकास, पुनर्विकास अशा प्रकल्पना अधिकाधिक चालना देत आहोत. मुंबईचे रूप पालटणाऱ्या विकासाचे मॉडेल राबवायचे आहे.

मुंबई आणि राज्यात महायुतीला किती जागा मिळतील?

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत. यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवत आहोत. यांच्या नेतृत्वात देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जायचे आहे. यासाठी सर्व जनता महायुतीच्या मागे खंबीरपणे उभी राहील, असा मला विश्वास आहे. गेल्यावेळीपेक्षा अधिक जागा यावेळी येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahapalika Election: सर्वात मोठी बातमी! 'या' प्रभागातील निवडणूकीला न्यायालयाची अंतरिम स्थगिती, मतदान कधी होणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

Madhav Gadgil: ‘नीरी’ला कटू सत्याची करून दिली आठवण; पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण अहवालातील त्रुटी केल्या होत्या उघड!

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT