Sharad Pawar sakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar : यंत्रणांचा गैरवापर ही अघोषित आणीबाणी ; ज्येष्ठ नेते शरद पवार ,देशातील जनतेची मानसिकता बदलाची

‘‘तपास यंत्रणांचा गैरवापर ही चिंतेची बाब आहे. देशात एकप्रकारची अघोषित आणीबाणी लागल्याचे यावरून स्पष्ट होत असून जनतेच्या मनातदेखील भीती आहे. त्यामुळेच जनता या वेळी बदलाच्या मानसिकतेत आहे,

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ‘‘तपास यंत्रणांचा गैरवापर ही चिंतेची बाब आहे. देशात एकप्रकारची अघोषित आणीबाणी लागल्याचे यावरून स्पष्ट होत असून जनतेच्या मनातदेखील भीती आहे. त्यामुळेच जनता या वेळी बदलाच्या मानसिकतेत आहे,’’ असे परखड मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्‍त केले.

प्रेस क्‍लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उपस्थिती होती. शरद पवार म्हणाले, ‘‘अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात प्रशासकीय कामकाज कसे आदर्शपणे सांभाळतात याचा आदर्श घालून दिला होता. मात्र त्यांनाच तुरुंगामध्ये टाकण्यात आले. विरोधी पक्षातील नेत्यांसाठी अशा प्रकारची भूमिका घेतली जात असून त्याकरिता तपास यंत्रणांचा सर्रास दुरुपयोग केला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील जाहीर सभेत महाराष्ट्रातील सिंचन गैरव्यवहाराचा उल्लेख केला. यातील दोषींना धडा शिकविणार, असे ते म्हणाले. त्यांना नक्‍की कोणता धडा द्यायचा होता, हे साऱ्या देशाने अनुभवले आहे.

कर्नाटकच्या एका भाजप नेत्याने पक्षाकडून देण्यात आलेला ४०० पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठी असल्याचे भाष्य केले होते. त्यावरूनच भाजपला संविधानात बदल करायचा असल्याचे सिद्ध होते. अपेक्षित बदल करून तपास यंत्रणांवर वर्चस्व मिळवायचे आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा छळ करायचा असे त्यांना अपेक्षित आहे. दिल्लीतील मद्यधोरण प्रकरणात कारागृहात असलेले संजय सिंह यांना जामीन मिळाला ही आनंदाची बाब आहे. ईव्हीएमवरील मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या मनात शंका आहे,’’ असेही पवार म्हणाले.

‘बारामतीचे चित्र वेगळे राहणार नाही’

बारामतीचा निकाल पूर्वीसारखाच राहणार असून सुप्रिया सुळेच खासदार असतील. त्यासोबतच शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हेच जिंकतील, असा दावा शरद पवार यांनी केला. साताऱ्यात आमच्या पक्षाकडे तीन उमेदवार तर काँग्रेसकडे एक-दोन उमेदवार आहेत. या जागेबाबत चर्चा सुरू असली तरी ती आमच्यासाठी सुटल्यास निश्‍चित या ठिकाणी आमचा उमेदवार जिंकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Buses Crash : गुजरातमधील सुरतमध्ये भीषण बस अपघात; महाराष्ट्रातील दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक, सहा जणांचा मृत्यू

MP Supriya Sule : गुन्हेगारी कमी झाल्याचे पत्र शहा-फडणवीसांना पाठवा! पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांचा पोलीस आयुक्तांना टोला

Latest Marathi News Live Update : सुरतमध्ये दोन बसची धडक: 6 जणांचा मृत्यू

Monsoon: काही तास बाकी! लवकरच मान्सून केरळात धडकणार, राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

IPL 2026: RCB च्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये विराटची भुवनेश्वर कुमारसोबत फुगडी; Viral Video ने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT