MLA Bacchu Kadu Raju Shetti Prachar Sabha Shirala esakal
लोकसभा २०२४

Hatkanangale Lok Sabha : राजू शेट्टींच्या प्रचारासाठी बच्चू कडू मैदानात; जाहीर सभेत म्हणाले, हिंदू-मुस्लिम संकटात नाहीत तर..

मुख्यमंत्री शिंदेंनी अडवलेला शेतकऱ्यांचा पैसा निवडणुकीनंतर वसूल केल्याशिवाय सोडणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

''हिंदू मुस्लिम आतंकवाद वाढत चालल्याचे काँग्रेस व भाजपवाले म्हणताहेत. पण राजकारणाचा आतंकवाद सुरू आहे.''

शिराळा : ‘‘मी नेता म्हणून नव्हे; तर शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या प्रचाराला आलोय. कोणी म्हणतो हिंदू संकटात आहे, तर कोणी मुस्लिम. हिंदू वा मुस्लिम (Hindu or Muslim) संकटात नाहीत तर शेतकरी, कष्टकरी, मजूर संकटात आहेत. जात व धर्म एकत्र आणल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना निवडून येता नाही. हिंदू मुस्लिम आतंकवाद वाढत चालल्याचे काँग्रेस व भाजपवाले म्हणताहेत. पण राजकारणाचा आतंकवाद सुरू आहे. तो शेतकऱ्यांविरोधात आहे. जातीपलीकडे जाऊन संघटना मजबूत करावी,’’ असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केले.

शिराळा येथे हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदार संघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टींच्या प्रचार सभेत ते बोलत होते. कडू म्हणाले, ‘‘आमचे तिकीट गावातून पक्के होते. त्यांचे दिल्ली-मुंबईतून. हाच त्यांच्यात व आमच्यात फरक आहे. हक्क हवा असेल तर व्यवस्थेविरोधात लढायला शिका. निवडणुका आल्यावर जातीचं राजकारण पेरलं जातं. शेतकऱ्यांसाठी लढणारे कोणी नाहीत. आमच्यावर शेतकऱ्यांचा दबाव राहील. गरिबांना सर्व उशिरा दिले जाते. जातधर्माच्या नावावर कमजोर केले आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या शेट्टींना लोकसभेत पाठवा.’’

शेट्टी म्हणाले, ‘‘गतवेळी बेसावध होतो. आता चूक करणार नाही. म्हणून स्वतंत्र उभा राहिलो. माझ्या पराभवासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री व अन्य दिग्गज आले त्यांना एकटा पठ्ठा भारी आहे. हा अहंकार व घमेंड नाही तर माझ्यामागे करपलेले चेहरे आणि त्यांची ताकद आहे. विरोधकांच्या सभेला भाड्याने लोक आणावे लागतात. आता पैशांचा पाऊस पडेल. सुरत लुटीचा अड्डा होता. सुरतेचा खजिना लुटा. सामान्य माणूसच विरोधकांची पैशांची मस्ती उतरून टाकेल. कितीही पैसा उधळला तरी मीच निवडून येणार. मुख्यमंत्री शिंदेंनी अडवलेला शेतकऱ्यांचा पैसा निवडणुकीनंतर वसूल केल्याशिवाय सोडणार नाही.’’

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, प्रहार तालुकाध्यक्ष बंटी नांगरे-पाटील, जालिंदर पाटील, तात्या बालवडकर, सौरभ शेट्टी, अतुल दिघे, कैलास देसाई, संदीप राजोबा, देवेंद्र धस, सूर्यकांत जाधव, आनंदराव पाटील, सुनील पाटील, मानसिंग पाटील, राजू शेळके, जनार्दन पाटील, अनुसया पाटील, सुनीता कांबळे, जयश्री पाटील, राजू शिंदे, रवी पाटील, अजिंक्य कोळी, अवधूत नांगरे, अॅड. गौस मुजावर, अमर कदम, सूर्यभान जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT