Uddhav Thackeray esakal
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

महाविकास आघाडी अन् इंडिया आघाडीची परिवर्तन सभा आज बीकेसीत पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाविकास आघाडी अन् इंडिया आघाडीची परिवर्तन सभा आज बीकेसीत पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार बरसले. मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा, असं थेट आव्हानच यावेळी त्यांनी मोदींना दिलं. तसंच येत्या ४ जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. (Modi ji if you dare try to end me Uddhav Thackeray direct challenge to PM Modi)

उद्धव ठाकरे म्हणाले, "मला काही वेळा काही लोकांची कीव येते की हे लोक असं जमवतात की जणू देशातील सर्व प्रश्न संपले आहेत, महागाई कमी झालेली आहे. सगळ्यांना रोजगार मिळेलेला आहे. सर्वजण ढेकर देऊन सुस्त पडलेत अशा वातावरणात लोक राहतात. चीन तिकडं आतमध्ये घुसला आहे. तिकडं ना मोदी जायला तयार ना अमित शहा जायला तयार नाही. पण सगळी फौज भाडोत्री, गद्दारांना घेऊन आज उद्धव ठाकरेंना संपवायला इकडे आलेले आहेत. पण मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करुन बघा, हा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही"

हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तो शहा-मोदी-अदानीचा महाराष्ट्र कदापी होऊ देणार नाही. तुम्ही कितीही डोकी आपटा, तुमची डोकी फुटतील. पण माझा मर्द मराठा एकही फुटणार नाही. तुम्ही जे सगळे गद्दार घेत आहात घ्या, काहीवेळेला एक गोष्टी बरी असते जो निसर्गाचा नियम आहे. ऋतु येतात ऋुतू जातात त्यामुळं सडलेली पान ही झडून जातात, त्याशिवाय नवी पानं येत नाहीत. आज सगळी सडलेली पानं माझ्या शिवसेना या वृक्षानं टाकून दिलेली आहेत, ही पानं कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाल्यानं तुमच्या गळ्यात घातलीत. भाजप हा कचरा जमाव पक्ष झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT