Nashik Loksabha Constituency sakal
लोकसभा २०२४

Nashik Loksabha Constituency : खासदार हेमंत गोडसे ‘वर्षा’वर तळ ठोकून

नाशिक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा वाढतच चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, अपेक्षित असूनही हेमंत गोडसे यांचे नाव त्या यादीत नव्हते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नाशिक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा वाढतच चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी काल आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, अपेक्षित असूनही हेमंत गोडसे यांचे नाव त्या यादीत नव्हते.

याबाबत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटात तीव्र रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळेच नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी ‘वर्षा’वर तळ ठोकताना उमेदवारी नक्की करण्यासाठी जोराचा प्रयत्न करत असल्याचे समजते. या जागेबाबत गोडसे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याचेही समजते.

गोडसेंनी मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचा व त्या दृष्टीने सकारात्मक चर्चा सुरू असल्याचेही म्हटले आहे. याच जागेवरून अजित पवार गटाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ  यांचेही नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे गोडसे यांच्या उमेदवारीचा हा गुंता वाढतच चालला आहे.

पहिल्या यादीत विद्यमान खासदार गोडसे यांचे नाव नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे व इतरांनी या जागेवरील शिंदे गटाच्या दाव्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मात्र मध्येच राष्ट्रवादीच्या अजि पवार गटाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT