MP Mahua Moitra vs Amrita Roy going to be tough fight lok sabha election Sakal
लोकसभा २०२४

लक्षवेधी लढत : मोईत्रा वि.‘राजमाता’

पश्‍चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील लढत यंदा रोमहर्षक ठरणार आहे. खासदार महुआ मोईत्रा विरुद्ध राजघराण्यातील अमृता रॉय यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे.

श्‍यामल रॉय

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील लढत यंदा रोमहर्षक ठरणार आहे. खासदार महुआ मोईत्रा विरुद्ध राजघराण्यातील अमृता रॉय यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये ‘राजमाता’ म्हणून लोकप्रिय असलेल्या अमृता रॉय यांना भाजपने कृष्णनगरमधून निवडणूक मैदानात उतरविले आहे. राजमाता यांच्या उमेदवारीने तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार व खासदार महुआ मोईत्रा यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

राजघराण्याचा वारसा

अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला लाभ होऊ शकेल, अशी पक्षाला आशा वाटत आहे. नादिया राजघराण्यातील अमृता रॉय यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने राज्यातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली, त्यात राजमातेच्या नावासह १११ नावांचा समावेश होता.

वयाच्या १८ व्या वर्षी सिंहासनावर आरूढ झालेले कृष्णचंद्र हे सर्वगुणी राजे होते. राज्यकर्ते म्हणून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासनात त्यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा करून राज्याच्या विकासात योगदान दिले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर आणि राजघराण्यातील वारसदारांवर कायमचा प्रभाव राहिला.

महुआ मोईत्रांवर आरोप

कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सहा लाख १४ हजार ८७२ मते मिळाली होती. भाजपच्या कल्याण चौबे यांना पाच लाख ५१ हजार ६५४ मते पडली होती. साधारण ६३ हजार मतांनी मोईत्रा यांचा विजय झाला होता.

पैशाच्या बदल्यात प्रश्‍न विचारल्याच्या आरोपावरून महुआ यांची काही महिन्यांपूर्वी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मोईत्रा यांची दक्षिण कोलकतामधील कृष्णनगर आणि अलीपूरमधील निवासस्थाने आणि लोकसभा कार्यालयाची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने नुकतीच झडती घेतली; परंतु तपास यंत्रणेला रिकाम्या हाताने परतावे लागले.

‘तृणमूल’ अडचणीत

भ्रष्टाचाराचे आरोप आणि पक्षातील वाद हे तृणमूल काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहेत. भाजपच्या सूत्रानुसार, स्थानिक, प्रभावशाली आणि परिचित चेहरा असलेल्या राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिल्याने पक्षाला मतांची दरी कमी करण्यास आणि कृष्णनगरमध्ये ताकद वाढविण्यात मदत होऊ शकेल.

मतांची टक्केवारी

२०१४

  • तपस पॉल (तृणमूल काँग्रेस) ३५.१४%

  • डॉ. शंतनू झा (माकप) २९.४३%

२०१९

  • महुआ मोईत्रा (तृणमूल काँग्रेस) ४५%

  • कल्याण चौबे (भाजप) ४०.३७%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT