Dry Day 
लोकसभा २०२४

Dry Day: लोकसभेच्या निकालादिवशीच्या 'ड्राय डे'चं काय? हायकोर्टानं निकाली काढली याचिका

लोकसभेच्या निकालाच्या दिवसासह आधी दोन दिवस मुंबईसह परिसरात दारुची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : लोकसभेच्या निकालाच्या आधी दोन दिवस अर्थात ४ जून पूर्वी दोन दिवसांपासून मुंबईसह परिसरात दारुची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. या आदेशाला हॉटेल आणि बार व्यवसायिकांनी कडाडून विरोध केला होता. यासंदर्भात त्यांनी थेट हायकोर्टात धावही घेतली. त्यावर आज सुनावणी पार पडली. यामध्ये हायकोर्टानं निकाल दिला आणि ही याचिका निकाली काढली. (Mumbai dry day at Lok Sabha result day Mumbai High Court gives permission till counting)

मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे ची केलेली घोषणा ही अन्यायकारक असल्याचं हॉटेल आणि बार मालकांचं होतं. हे आदेश केवळ निकालाच्या दिवशी आणि मतमोजणीपर्यंतच असावेत अशी मागणी हॉटेल चालकांनी त्यांच्याकडं केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याला साफ नकार दिला.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाचं आम्ही पालन करत आहोत, असं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं होतं. त्यानंतर हॉटेल असोसिएशननं मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबईच्या जवळच रायगड जिल्ह्यात तर मतदानाचा निकाल जाहीर होईपर्यंतच ड्राय डेचे आदेश आहेत. याचाही उल्लेख या याचिकेत करण्यात आला होता.

हायकोर्टानं दिला निकाल

या याचिकेवर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण दिवस 'ड्राय डे' नसेल असा महत्वाचा निकाल हायकोर्टानं दिला आहे. त्यामुळं आता निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईत मद्यविक्री करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT