Narendra Modi sakal
लोकसभा २०२४

Narendra Modi : ....हा अवमान देश सहन करणार नाही ; पित्रोदांच्या वांशिक टिपणीवरून मोदींचा घणाघात

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. केवळ रंगावरून होणारा अवमान या देशातील नागरिक कधीच सहन करणार नाहीत असे मोदी यांनी म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. केवळ रंगावरून होणारा अवमान या देशातील नागरिक कधीच सहन करणार नाहीत असे मोदी यांनी म्हटले आहे. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये पराभूत व्हाव्यात असे काँग्रेसला का वाटत होते? हे आता आपल्याला समजले असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते वरंगळ येथे आयोजित सभेत बोलत होते.

मोदी म्हणाले, ‘‘ माझ्या देशातील लोकांची क्षमता ही ते कसे दिसतात यावरून ठरेल का? हा त्वचेच्या रंगाचा खेळ खेळण्याची परवानगी शहेजादे यांना कोणी दिली? पित्रोदा यांच्या वक्तव्याची मला चीड आली आहे. एखाद्याने माझा अवमान केला तर मी चिडत नाही. मी तो अपमान सहन करतो.

शहजादा यांच्या मार्गदर्शकांनी केलेल्या या वक्तव्याचा मला राग आला. जे लोक आज राज्यघटना हातात घेऊन व्यासपीठावर नाचत आहेत तेच रंगाच्या आधारावर देशातील नागरिकांचा अवमान करत आहेत. शहजाद्यांचे मार्गदर्शक ज्यांचा रंग काळा आहे ते सगळे आफ्रिकी देशांचे रहिवासी आहेत असे म्हणतात. पित्रोदा यांनी ज्यांचा रंग काळा आहे अशा सर्वांचाच अवमान केला. हा देश भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो व आपला रंग हा श्रीकृष्णासारखा आहे.’’

त्यांचे तिसरे फ्यूज उडाले

काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे तिसरे फ्यूजही आता उडाले आहे. आता त्यांची नेतेमंडळी भिंगाचा वापर करून सुरक्षित जागा शोधू लागली आहेत. आता चौथ्या टप्प्यामध्येही त्यांना भिंगांचा वापर करावा लागेल. जनतेच्या आशीर्वादावर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे असे मोदी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT