Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : नाशिक, ठाणेही शिवसेनेकडे शक्य ; छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ उमेदवारी मिळविणार

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्री संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्री संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ नाशिक व ठाणेही शिवसेना ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वीच नाशिकमधून माघार घेतल्याने येथील जागेचाही प्रश्न सुटल्यात जमा आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसापासून शिवसेना नेमक्या किती जागा लढवणार यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, पक्ष ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जागा लढवणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट सांगत आहेत. त्यामुळे शिवसेना राज्यात एकूण १३ जागा लढवणार असल्याचे समजत आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक या हक्काच्या जागांसाठी शिंदेच्या शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र, कालच शिवसेना नेते व मंत्री संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांचा संभ्रम बऱ्यापैकी दूर झाला आहे. त्यातच आता प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाणे व नाशिक या दोन्ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये ही विश्वास निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT