Navneet Rana esakal
लोकसभा २०२४

Navneet Rana: अमरावतीचं राजकारण तापलं! महायुतीत बंड होणार, अभिजीत अडसूळ नवनीत राणांना ठरणार नवा पर्याय?

Amravati Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काल (बुधवार) उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्वात मोठे नाव आहे नवनीत राणा यांचे ज्या अमरावतीमधून निवडणूक लढवणार आहेत.

Sandip Kapde

Amravati Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काल (बुधवार) उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्वात मोठे नाव आहे नवनीत राणा यांचे ज्या अमरावतीमधून निवडणूक लढवणार आहेत. नवनीत राणा अमरावती मतदार संघात विद्यमान खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराठिंब्याने त्यांनी २०१९ मध्ये विजय मिळवला होता.

नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असली तरी त्या दीर्घकाळापासून भाजपच्या विचारसरणीने प्रेरित आहेत. ज्या प्रकारे त्यांनी हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित केला, ज्या प्रकारे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक मुद्द्यांवर कोंडीत पकडले त्यावरून नवनीत हे भाजपसाठी योग्य असल्याचे मानले जात होते. आता पक्षानेही यावेळी त्यांच्या उमेदवारीवर विश्वास व्यक्त केला असून पुन्हा त्या अमरावतीतूनच निवडणूक लढवणार आहेत.

मात्र अमरावतीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला मोठा विरोध पाहायला मिळत आहे. महायुतीत अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. अमरावतीत शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ इच्छुक होते. ते अमरावतीत शिवसेनेकडून खासदार देखील पाहीले आहे. २०१४ मध्ये त्यांनी नवनीत राणांचा पराभव केला होता. तसं म्हटलं तर हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. इतिहासात पहिल्यांदा अमरावतीत कमळ चिन्हावर निवडणूक लढवल्या जाणार आहे. मात्र महायुतीत बंड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे बच्चू कडू आधीच नाराज आहेत. आत शिंदे गटाते नेते अभिजीत अडसूळ बंड करण्याच्या तयारीत आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचे अभिजित यांनी सांगितले आहे. अभिजीत अडसूळ हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत.

अभिजीत अडसूळ म्हणाले, आम्ही प्रत्येकवेळी आमची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचा जातीचा दाखला खोटा आहे. भाजपच्या सर्व नेत्यांचा राणा यांना अमरावतीत विरोध आहे. बच्चूभाऊंचा, राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र आहोत. आम्हाला सांगून निर्णय घेतला जाईल असं सांगिलतं होत. मात्र तस न होता उमेदवारी जाहीर झाली. (Amravati Lok Sabha news)

भाजप कार्यकर्त्यांवर राणा यांनी अन्याय केला आहे. त्यामुळे मनातून कोणीही त्यांच्यासोबत कोणीही नाही. वेळ आली तर अपक्ष उमेदवारी दाखल करु. त्यांच जात प्रमाणपत्र खोटं होतं. त्यांना दंड देखील सुनावला आहे, असे अभिजीत अडसूळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT